मुंबई, 07 नोव्हेंबर: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा (Shah Rukh Khans Son Arrest) आर्यन खानला (Aryan Khan Case Update) अटक झाल्यानंतर या प्रकरणात दररोज नवनवे अपडेट समोर येत आहेत. आर्यनला जामीन मिळाल्यानंतर देखील काही महत्त्वाचे अपडेट समोर आले आहेत. CNN News18 ला मिळालेल्या एक्सक्लूझिव्ह माहितीनुसार, कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणात (Mumbai Cruise Drug Case) मोठ्या प्रक्रियात्मक त्रुटी आढळून आल्या आहेत. याप्रकरणात कॉर्डेलिया क्रूझ छाप्यांदरम्यान NCBच्या दिल्ली टीमला (NCB Delhi Team Aryan Khan Case) मोठ्या प्रमाणात प्रक्रियात्मक त्रुटी आढळून (Major procedural lapses observed by Delhi team in Cordelia cruise raids) आल्या आहेत.
एनसीबीने एसआयटी स्थापन केली आहे. मुंबईतील प्रकरणं सेंट्रल युनिटकडे हलवण्यात आली आहे. आर्यन खान तपास प्रकरणातून समीर वानखेडेंना बाजूला करण्यात आले आहे. समीर वानखेडे यांना आर्यन खानच्या चौकशीतून हटवण्यात आले असून या प्रकरणाचा आता दिल्लीची टीम तपास करत आहे. या प्रकरणाचा तपास आता वरिष्ठ अधिकारी संजय सिंह यांच्याकडे आहे. दरम्यान सूत्रांच्या माहितीनुसार आता या प्रकरणाच्या तपासात दिल्ली टीमला काही त्रुटी आढळून आल्या आहेत.
हे वाचा-Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरातून मायशा अय्यर OUT; ईशान सेहगलला अश्रू अनावर
सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की, दिल्ली टीमच्या मते या प्रकरणातील तपास अधिकारी नियमित छापे आणि जप्ती प्रक्रियेपासून विचलित झाले. शिवाय संपूर्ण जप्तीशिवाय क्रूझला प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार हे अधिकारी केवळ आर्यन खानच्या अटकेसाठी उत्सुक होते आणि त्यांनी इतर अनेकांना बोर्ड करण्याची परवानगी दिली. दिल्ली टीमसमोर आलेल्या त्रुटींमधील आणखी एक बाब म्हणजे स्कॅनर अंतर्गत आयओची भूमिका आणि चौकशीची दिशाभूल केली गेली. आर्यन खानच्या कोठडीदरम्यानची सुरक्षा हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. दिल्ली टीम करत असलेल्या चौकशीदरम्यान याबाबत सत्य समोर येईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aryan khan, NCB