• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरातून मायशा अय्यर OUT; ईशान सेहगलला अश्रू अनावर

Bigg Boss 15: बिग बॉसच्या घरातून मायशा अय्यर OUT; ईशान सेहगलला अश्रू अनावर

बिग बॉस 15 (Bigg Boss 15) च्या कालच्या भागा मध्ये सलमान खाननं स्पर्धकांना मोठा झटका देत शनिवारीच घरातून बाहेर पडलेल्या स्पर्धकाच्या नावाची घोषणा केली.

 • Share this:
  मुंबई, 7 नोव्हेंबर-  बिग बॉस 15  (Bigg Boss 15)  च्या कालच्या भागा मध्ये सलमान खाननं  स्पर्धकांना  मोठा झटका देत शनिवारीच घरातून बाहेर पडलेल्या स्पर्धकाच्या नावाची घोषणा केली. वीकेंड का वार भागात, सलमान खानने सर्व स्पर्धकांना त्यांच्या आठवडाभर चालणाऱ्या खेळाबद्दल सांगितले. दिवाळी स्पेशल वीकेंड असल्याने स्पर्धक इव्हिक्शनसाठी तयार नव्हते. पण सलमान खानने सर्वांना चकित करत इव्हिक्शनची घोषणा केली. स्प्लिट्सविला विजेती मायशा अय्यर (Miesha Ayyar Evicted) आता शोमधून बाहेर पडली आहे.शो दरम्यान मायशाच्या प्रेमात पडलेला ईशान सेहगल हे ऐकताच भावुक होऊन रडू लागला. यावेळी बिग बॉस 15 च्या घरातून दोन स्पर्धक बाहेर पडणार आहेत. आज म्हणजेच रविवारी एका स्पर्धकाला घराबाहेरचा रस्ता दाखवला जाईल. या आठवड्यात नॉमिनेशनमध्ये  पाच जण होते. मायशासोबत सिंबा नागपाल, अफसाना खान, उमर रियाझ, इशान सहगल यांनाही घराबाहेर पडण्यासाठी नॉमिनेट करण्यात आले होते. उद्या काय होणार हे आजही घरच्यांना माहीत नाही. मायशा अय्यरच्या जाण्याने इशान सहगल अस्वस्थ दिसत होता, तर मायशा एकदम शांत दिसत होती. मायशा अय्यरला बिग बॉसने सर्वप्रथम कन्फेशन रूममध्ये बोलावले होते. त्यानंतर त्याला बाहेर काढण्याबाबत सांगितले. सलमान खानने तिचे नाव घेतले. त्यानंतर ती सर्वांना भेटली. ईशानला मिठी मारताना ती म्हणाली की आज जर मी या शोमधून बाहेर पडले नसते  तर तू कदाचित या शोमधून बाहेर पडला असतास.दुसरीकडे, सलमान खान सर्व स्पर्धकांना सतर्क करतो आणि म्हणतो की आता विचार करण्याची गोष्ट आहे,  ज्या लोकांसाठी कॉल आले आहेत, त्यांना काही का विचारले नाही. सलमानने मायशासोबत इशान सहगलसोबतच्या नात्याबद्दलही चर्चासुद्धा केली. (हे वाचा:Bigg Boss 15: मायशा-ईशानच्या रडण्याची निशांतनं उडवली खिल्ली; पाहून ... ) आता आज घरातून कोण बाहेर होईल, हे अजून निश्चित झालेले नाही, पण वोटिंग ट्रेंड बघितला तर आजच्या एपिसोडमध्ये ईशान सहगल बिग बॉसच्या घरातून बाहेर होऊ  शकतो. राजीवच्या घरी आल्यानंतर इशान आणि मायशा एकमेकांपासून दूर जाताना दिसले होते आणि कदाचित त्यामुळेच प्रेक्षक त्यांच्याशी कनेक्ट होऊ शकले नाहीत. असा अंदाज वर्तवला जात आहे. तर दुसरीकडे नुकताच शमिता आणि निशांतमध्ये ईशान व मायशावरून कडाक्याचं भांडण झालं होतं. टास्कदरम्यान भावूक झालेल्या मायशा आणि ईशान सेहगलची निशांत भट आणि तेजस्वी प्रकाश यांनी खिल्ली उडवली होती. शमिता शेट्टी  (Shamita Shetty)  निशांतला  (Nishant Bhatt) दोघांची चेष्टा करताना पाहत होती. ज्यामुळे ती संतापली. थोड्या वेळाने, तिचा स्वतः वरील ताबा सुटला आणि तिने निशांतला लोकांबद्दल असंवेदनशील असल्याबद्दल फटकारण्यास सुरुवात केली.
  Published by:Aiman Desai
  First published: