मुंबई, 16 फेब्रुवारी: मुंबईतील प्रसिद्ध नायर रुग्णालयामध्ये (Nair Hospital) एका तरुण डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. अवघ्या 26व्या वर्षी या डॉक्टरने (Doctor Committed Suicide) टोकाचे पाऊल उचलले. त्यांच्या खोलीमध्ये त्यांचा मृतदेह सापडला होता असून अद्याप आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट आहे. 15 फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली.
डॉ. भिमसंदेश प्रल्हाद तुपे असं या डॉक्टरांचं नाव असून ते 3 दिवसांपूर्वीच औरंगाबादमध्ये जाऊन आले होते. त्यांच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याने ते औरंगाबादेत गेले होते, तीनच दिवसांनी तुपे असं पाऊल उचलतील असं कुणाच्याही ध्यानीमनी नव्हतं. परवा ते औरंगाबाद इथून परतले, सोमवारी त्यांनी दिवसभर काम देखील केलं. संध्याकाळी त्यांनी त्यांच्या खोलीमध्ये जाऊन इंजेक्शन घेत आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे.
Maharashtra: A 26-year-old doctor allegedly died by suicide at Nayar Hospital in Mumbai. His body was found in his room & has been sent for postmortem. Reason behind the suicide yet to be ascertained. Police registered an Accidental Death Report. Further investigation is underway
— ANI (@ANI) February 16, 2021
डॉ. तुपे अॅनेस्थेशिया विभागात एमडीचे शिक्षण घेत होते. अद्याप डॉ. तुपे यांनी का आत्महत्या केली याचे कारण मात्र अस्पष्ट आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. दरम्यान मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून अग्निपाडा पोलीस ठाण्यात याप्रकणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. डॉ. तुपे यांनी एवढं कठोर पाऊल उचलण्यामागचं कारण काय असेल, याचा शोध पोलीस घेत आहेत. 2019 साली डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी हेच नायर रुग्णालय रॅगिंगमुळे चर्चेत आलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Dr tume, Father passed away, Maharashtra, Mumbai, Nair hospital, Police, Suicide