मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

कसला खटाटोप! घरच्यांचं किती प्रेम आहे पाहण्यासाठी रचली स्वतःच्या अपहरणाची कथा, मात्र पुढे घडलं भलतंच

कसला खटाटोप! घरच्यांचं किती प्रेम आहे पाहण्यासाठी रचली स्वतःच्या अपहरणाची कथा, मात्र पुढे घडलं भलतंच

बीड जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणीवर सांगलीतील एका युवकाने अत्याचाराचा कळस गाठला आहे. (File Photo)

बीड जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या एका 28 वर्षीय तरुणीवर सांगलीतील एका युवकाने अत्याचाराचा कळस गाठला आहे. (File Photo)

युवकानं आपल्या कुटुंबातील सदस्यांचं आपल्यावर किती प्रेम आहे, हे तपासण्यासाठी स्वतःच्याच अपहरणाचा (kidnapping) कट रचला. मात्र, स्वतःच पसरवलेल्या या जाळ्यात तोच अडकला आणि पोलिसांच्या (Police) ताब्यात सापडला.

  • Published by:  Kiran Pharate

लखनऊ 29 मे : अपहरणाची (kidnapping) एक आगळीवेळी बातमी समोर आली आहे. एका युवकानं आपल्या कुटुंबातील सदस्यांचं आपल्यावर किती प्रेम आहे, हे तपासण्यासाठी स्वतःच्याच अपहरणाचा कट रचला. मात्र, स्वतःच पसरवलेल्या या जाळ्यात तोच अडकला आणि पोलिसांच्या (Police) ताब्यात सापडला. हे प्रकरण आहे उत्तर प्रदेशच्या (Uttar Pradesh) मिर्जापूरमधील कटरा कोतवाली ठाण्याच्या क्षेत्रातील.

इथे राहाणाऱ्या इश्तियाक नावाच्या एका युवकानं आपल्या अपहरणाची खोटी कथा तयार केली आणि ते घरातील पसार झाला. यानंतर कुटुंबीयांनी पोलिसांकडे त्याच्या अपहरणाची तक्रार दाखल केली. अपहरणाचं प्रकरण असल्यानं पोलिसांनीही गतीनं तपास सुरू केला आणि पोलिसांनी संबंधित युवकाला शोधून काढलं. यानंतर या युवकानं पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितलं, की त्यानं स्वतःच आपल्या अपहरणाचा बनाव केला होता. पोलिसांनी सांगितलं, की तीन दिवसाआधी इमामबाडा येथील रहिवासी असलेल्या असलम यानं आपला भाऊ इश्तियाक याचं अपहरण झाल्याची शंका व्यक्त करत ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

पोलिसांनी इश्तियाकला प्रयागराजच्या सोराव परिसरातून शोधून काढलं. इश्तियाकला हे पाहायचं होतं, की कुटुंबातील लोकांचं त्याच्यावर किती प्रेम आहे. यामुळे त्यानं स्वतःच घरातून निघून जात स्वतःच फोन करुन एका व्यक्तीनं आपल्याला उचलून नेलं असल्याचं सांगितलं होतं. पोलिसांनी चुकीची माहिती देऊन त्रास देण्यासाठी आणि शांतता भंग करण्यासाठी त्याच्याविरोधात कारवाई केली आहे. पोलिसांनी सांगितलं, की इश्तियाकचा भाऊ असलम यानं पोलिसांनी माहिती दिली, की काही लोकांनी त्याच्या भावाचं अपहरण केलं आहे. पोलिसांनी तपास केला असता, लोकेशन प्रयागराजच्या सोरावमध्ये आढळलं. युवकाला ताब्यात घेतल्यानंतर असं समोर आलं, की त्याचं अपहरण झालं नसून घरचे लोक आपल्यावर किती प्रेम करतात हे पाहाण्यासाठी त्यानं स्वतःच हा घाट घातला होता.

First published:

Tags: Crime news, Kidnapping