जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / BMCची मोठी कारवाई! मुंबईच्या गोवंडी परिसरात 200 झोपड्या जमीनदोस्त

BMCची मोठी कारवाई! मुंबईच्या गोवंडी परिसरात 200 झोपड्या जमीनदोस्त

BMCची मोठी कारवाई! मुंबईच्या गोवंडी परिसरात 200 झोपड्या जमीनदोस्त

मुंबई महापालिकेने गोवंडी परिसरात मोठी कारवाई केली आहे. महापालिकेने गोवंडी परिसरातील तब्बल 215 झोपड्या जमीनदोस्त केल्या आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 मे : मुंबई महापालिकेने गोवंडी परिसरात मोठी कारवाई केली आहे. महापालिकेने गोवंडी परिसरातील तब्बल 215 झोपड्या जमीनदोस्त केल्या आहेत. अनधिकृत बांधकामाच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेकडून याबाबतचं प्रसिद्धपत्रक जारी करुन माहिती जारी करण्यात आली आहे. संबंधित कारवाई करण्याआधी परिसरातील नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पण न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम विरोधातील कारवाईला स्थगिती दिली नाही. त्यामुळे संबंधित कारवाई करण्यात आली. मुंबई महानगरपालिकेच्या ‘एम/पूर्व’ विभाग हद्दीतील प्रभाग क्रमांक 144 मधील सीटीएस क्रमांक 5/6, देवनार गांव, पाटीलवाडी, गोवंडी, मुंबई येथे खासगी मोकळ्या जमिनीवर मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या बांधल्याची तक्रार पालिका प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. त्यावर तात्काळ नोटीस देऊन काल (10 मे) गोवंडी परिसरातील 215 अनधिकृत झोपड्यांवर निष्कासनाची कारवाई ‘एम/पूर्व’ विभागाचे सहाय्यक आयुक्त महेंद्र उबाळे यांच्या पुढाकाराने करण्यात आली, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकातून जारी करण्यात आली आहे. ( ‘अयोध्या दौऱ्याकरता मोदींची मदत घ्यावी’ अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला ) उच्च न्यायालयात अनधिकृत झोपड्यांना निष्कासित होण्यापासून संरक्षण मिळण्यासाठी नोटीस धारकांनी खटला दाखल केला होता. पण महानगरपालिकेच्या सतर्कतेमुळे आणि प्रभावी युक्तिवादामुळे न्यायालयाने स्थगिती आदेश दिले नाही आणि नोटीस धारकांची याचिका फेटाळून लावली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार महानगरपालिकेतर्फे 30 एप्रिल 2022 रोजी नोटीस धारकांस अंतिम आदेश पारित करण्यात आले होते. त्यानंतर काल (10 मे) ‘एम/पूर्व’ विभागाचे सहाय्यक आयुक्त महेंद्र उबाळे यांच्या पुढाकाराने सदर ठिकाणी बांधण्यात आलेल्या 215 झोपड्यांचे इमारत कारखाने ‘एम/पूर्व’ खात्यामार्फत 2 जे. सी. बी. व 20 कामगार यांच्या मदतीने निष्कासित करण्यात आले, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात