जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / 'अयोध्या दौऱ्याकरता मोदींची मदत घ्यावी' अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

'अयोध्या दौऱ्याकरता मोदींची मदत घ्यावी' अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

'अयोध्या दौऱ्याकरता मोदींची मदत घ्यावी' अभिनेत्री दीपाली सय्यद यांचा राज ठाकरेंना टोला

मागच्या काही दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणातून मनसे भाजपशी युती करणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे.अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपली सय्यद यांनी देखील यासंदर्भात एक ट्विट केले आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 11 मे- आपल्या डान्सच्या कौशल्यानं सा-यांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री दीपाली सय्यद ( deepali syed ) या समाज कार्यत देखील सक्रीय दिसतात. याशिवाय दीपाली सय्यद सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असतात. तसेच आलीकडे त्यांचा राजकारणात देखील सहभाग वाढला आहे. मागच्या काही दिवसांत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषणातून मनसे भाजपशी युती करणार की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीकडून राज ठाकरेंवर (  raj thackeray ) टिका होत आहे. अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या दीपली सय्यद यांनी देखील यासंदर्भात एक ट्विट केले आहे. सध्या दीपाली सय्यद यांचे ट्वीट चांगलेच चर्चेत आलं आहे. दीपाली सय्यद यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, मोदींना खूश करण्याकरता जीवाचं रान करणाऱ्या राजसाहेबांनी अयोध्याच्या दौऱ्याकरीता मोदींचा सल्ला व मदत घ्यावी. कदाचीत माफीनाम्याची गरज पडणार नाही…असा टोला त्यांनी राज ठाकरेंना लावला आहे. वाचा- वयाच्या 83व्या वर्षी कमबॅक ही अभिनेत्री, एकेकाळी बोल्डनेसमुळे गाजवला मोठा पडदा दीपाली सय्यद या काही दिवसापूर्वी त्यांच्या एका विधानावरून चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. यावरून मोठा वाद देखील निर्माण झाला होता. राणा दाम्पत्याच्या अटकेनंतर त्यांना भेटायला जाण्यासाठी निघालेले भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या कारवर शिवसैनिकांकडून दगडफेक झाली होती. या घटनेचं समर्थन करताना त्या म्हणाल्या होत्या की, ‘ती गाडी मोदींची जरी असती तरी गाडीवर चप्पल आणि दगड पडल्याच असत्या कारण शिवसैनिकांना बाळासाहेबांची शिकवण आहे. राजद्रोह गुन्हातील आरोपींना न्यायालय दंड लावून सोडणार असेल तर शिवसैनिंकांच्या फेकलेल्या चपल्लांचा हिशेबसुद्धा बंटी बबलीकडून घ्यावा, असंही यावेळी त्या म्हणाल्या होत्या.

जाहिरात

यावेळी बोलताना दीपाली सय्यद यांनी राणा दाम्पत्यानंतर, किरीट सोमय्यांचे खेळ आणि मशिदीवरील भोंग्यांचा विषय छेडला होता. ‘राणा दाम्पत्य तुरुंगात गेल्यानंतर त्यांना फाईव्ह स्टार हॉटेलची सुविधा हवी असल्यासारखी तऱ्हा झाली आहे. त्यांना घुटमळत आहे. पोलीस त्रास देताहेत. ते फाईव्ह स्टार नाही तर तुम्ही न्यायालयीन कोठडीत आहेत, हे सांगण्याची आता वेळ आली आहे. तसेच किरीट सोमय्या हे जरा काही झालं की दिल्ली, जरा काही झालं की मोदी यामध्ये गुरफटलेले आहेत, यांना लोकशाही माहितच नाही का ?…असा सवाल त्यांनी केला होता. आता पुन्हा एकदा त्यांचे राज ठाकरे यांच्याविषयची ट्वीट चर्चेत आलं आहे. वाचा- ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ फेम अभिनेत्री बनली आई, मीनाक्षी-कैलासला कन्यारत्न दीपाली यांनी अभिनयाशिवाय राजकारणातीह प्रवेश केला आहे. विविध मुद्द्यांवर लोकांना जागरुक करण्याचेही कार्य त्या करत असतात. पुरगस्तांची मदत असो किंवा मग मुलींच्या लग्नाची जबाबदारी स्वीकारणं असो असे अनेक कार्यांत दीपाली यांनी लोकांची मदत केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात