जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईकरांसाठी Good News! 10 टक्के पाणीकपातीचा निर्णय महापालिकेकडून रद्द

मुंबईकरांसाठी Good News! 10 टक्के पाणीकपातीचा निर्णय महापालिकेकडून रद्द

गुडन्यूज! मुंबईकरांना दिलासा; १० टक्के पाणीकपात रद्द करण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय

गुडन्यूज! मुंबईकरांना दिलासा; १० टक्के पाणीकपात रद्द करण्याचा मुंबई महापालिकेचा निर्णय

Mumbai Municipal Corporation decides to cancel water cut: काही दिवसांपासून मुंबईसह परिसरात सुरु असलेल्या जोरदार पाऊसामुळं मुंबईमध्ये सुरु असलेली १० टक्के पाणीकपात आजपासून मागे घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 8  जुलै : गेल्या काही दिवसांपासून पाणीकपातीचा सामना करणाऱ्या मुंबईकरांसाठी चांगली बातमी आहे. काही दिवसांपासून मुंबईसह परिसरात सुरु असलेल्या जोरदार पाऊसामुळं मुंबईमध्ये सुरु असलेली 10 टक्के  पाणीकपात (water cut) आजपासून मागे घेण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने (Mumbai Municipal Corporation) घेतला आहे. त्यामुळे आता मुंबईकरांना दिलासा मिळणार आहे. यंदा मान्सून दरवर्षीपेक्षा लवकर येणार असल्याचं भाकीत हवामानखात्यानं व्यक्त केलं होतं. केरळमध्ये मान्सून वेळेपूर्वीच दाखल झाला, मात्र महाराष्ट्रामध्ये मात्र पावसानं दडी मारली होती. जून महिन्यात चांगला पाऊस न झाल्यामुळं मुंबईसह राज्यांतील इतर प्रमुख शहरांमध्ये पाणीकपातीचे संकट उभं राहिले होते. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलाव क्षेत्रांमध्ये पाऊस कमी झाल्यामुळं पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली होती. अशातच मुंबई महानगरपालिकेकडून 27 जून 2022 पासून पाणी 10 टक्के पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु जुलै महिन्यात मात्र पावसाने मुंबईसह परिसरामध्ये दमदार हजेरी लावल्यामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेने सुरु असलेली 10 टक्के पाणीकपात रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. जून महिन्यात अपुऱ्या पावसामुळं मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील जलसाठ्यानं तळ गाठला होता. परिस्थिती लक्षात घेऊन पाऊसाच्या प्रमाणात वाढ होईपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनातर्फे मुंबईच्या पाणीपुरवठ्यात 27 जून  पासून 10 टक्के पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट ओढवले होते. त्यानंतर जुलैच्या महिन्याच्या सुरुवातीपासूनच मुंबईसह परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली.  समाधानकारक पावसामुळे तलाव क्षेत्रात पुरेशा प्रमाणात जलसाठा उपलब्ध झाल्याने आजपासून बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे करण्यात येणाऱ्या पाणी पुरवठ्यातील 10 टक्के पाणी कपातीचा निर्णय रद्द करण्यात आला. या निर्णय़ाने मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. हेही वाचा: PAN Card: पॅनकार्डमधील 10 अंकांचा काय असतो अर्थ? प्रत्येक नंबरमध्ये असते विशेष माहिती धरणांमध्ये 25.94 टक्के जलसाठा, पाणी जपून वापरण्याचे महापालिकेचे आवाहन- मुंबईला अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमधून पाणीपुरवठा केला जातो. मुंबईची तहान भागवण्यासाठी एकूण 14 लाख 47 हजार 363 दशलक्ष लिटर इतका उपयुक्त जलसाठा असावा लागतो. 27 जून 2022 रोजी या धरणांमध्ये 1 लाख 31 हजार 770 दशलक्ष लिटर म्हणजेच 9.10 टक्के एवढाच उपयुक्त जलसाठा उपलब्ध होता. परंतु जुलै महिन्यात सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या वरील सातही धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या या जलाशयांमध्ये एकूण 3 लाख 75 हजार 514 दशलक्ष लिटर अर्थात  25.94 टक्के एवढा उपयुक्त जलसाठा आहे. त्यामुळेच मुंबई प्रशासनानं 10 टक्के पाणीकपातीचा निर्णय मागे घेतला आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे मुंबईतील पाणीकपातीचा निर्णय महापालिकेनं मागं घेतला असला तरीही नागरिकांनी पाण्याचा वापर काळजीपूर्वक करावा, असे आवाहनही महानगरपालिका प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात