मुंबईतील दोन मेट्रो लाइन्समुळे दहा लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार

मुंबईतील दोन मेट्रो लाइन्समुळे दहा लाखांपेक्षा जास्त रोजगार निर्माण होणार

कोविड-19च्या (Covid 19 Pandemic) साथीमुळे देशातील (India) असंख्य नागरिकांवर बेरोजगारीची (Jobless) कुऱ्हाड कोसळली आहे.

  • Share this:

मुंबई, 25 मार्च:  कोविड-19च्या (Covid 19 Pandemic) साथीमुळे देशातील (India) असंख्य नागरिकांवर बेरोजगारीची (Jobless) कुऱ्हाड कोसळली आहे. अशा परिस्थितीत एक दिलासा देणारी बातमी वर्ल्ड रिसोर्स इन्स्टिट्यूट इंडियानं (WRI) दिली आहे. ती म्हणजे मुंबईत (Mumbai) उभ्या राहत असलेल्या दोन मेट्रो लाइन्समुळे (Metro Lines) शहरात दहा लाखांपेक्षा अधिक रोजगार निर्माण होणार आहेत. या संस्थेनं नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात हा निष्कर्ष नोंदवण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईत उभ्या राहणाऱ्या ‘2 ए दहिसर-डीएन नगर’ (2 A Dahisar-DN Nagar)आणि 7 दहिसर ईस्ट-अंधेरी (7 Dahisar East-Andheri) या दोन मेट्रो लाईन्समुळे शहरात तब्बल 1.1 दशलक्ष रोजगार (Jobs) निर्माण होणार आहेत.

केंद्र सरकारच्या 2014मधील आर्थिक सर्वेक्षणावर (Central Government’s Economic Census -2014) आधारित या अभ्यासानुसार, 2ए आणि 7 या दोन्ही मेट्रो लाईन्समधील एक किलोमीटर अंतराच्या बफर झोनमधील वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर या क्षेत्रात जवळपास 14 लाख रोजगार निर्माण होण्याची क्षमता आहे, तर मेट्रो-1 आणि पश्चिम उपनगर रेल्वे जाळ्यात दर चौरस किलोमीटर क्षेत्रात जवळपास 26 हजार रोजगार उपलब्ध आहेत. 2ए लाईनवर प्रती चौरस किलोमीटरवर हे प्रमाण 10 हजार 500 तर 7 क्रमांकांच्या लाईनवर 20 हजार 700 इतकं आहे. या दोन मेट्रो लाईन्सच्या तुलनेत मेट्रो एक आणि पश्चिम उपनगर रेल्वे मार्गावरील रोजगार उपलब्धतेचं प्रमाण कमी आहे, अशी बातमी हिंदुस्तान टाइम्सने दिली आहे.

‘आपण पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गालगत असलेल्या प्रत्येक किलोमीटर अंतरातील रोजगारांच्या सरासरी संख्येचा विचार केला तर मेट्रो लाईन 2ए आणि 7च्या जवळ तेवढेच रोजगार मिळू शकतील, असं गृहित धरलं तरी ही संख्या 1.1 दशलक्ष पेक्षा जास्त आहे,’ असं डब्ल्यूआरआय इंडियानं म्हटलं आहे. दरम्यान, 11.5 किलोमीटर लांबीची मेट्रो लाईन -1 कार्यरत असून, यंदा मेट्रो लाइन 2ए आणि 7 कार्यान्वित होण्याची अपेक्षा आहे.

मराठा आरक्षणासंदर्भात मोदी सरकारचा मोठा दावा; 50% मर्यादेचं समर्थन नाही

डब्ल्यूआरआय इंडिया रॉस सेंटरचे (WRI India Ross Centre) संचालक माधव पै म्हणाले, ‘जलद दळणवळणाची सुविधा देणाऱ्या या पायाभूत सुविधांच्या विकासामुळं या शहरात प्रचंड प्रमाणात रोजगार निर्मितीची क्षमता निर्माण होत असल्याचं या अभ्यासातून स्पष्ट दिसत आहे. यासाठी दीर्घकालीन समन्वयित नियोजन आणि अंमलबजावणीची आवश्यकता आहे. उदाहरणार्थ, दहिसर इथं तीन रेल्वे लाईन्स एकमेकांना छेदत असल्यानं हे उपनगर भविष्यातील जॉब हब (Job Hub) म्हणून विकसित करता येईल.’

‘ही क्षमता जास्तीत जास्त वाढवण्यासाठी मेट्रो स्टेशनच्या (Metro Station) आजूबाजूच्या परिसरात चांगले रस्ते, वाहतूक व्यवस्था, घरं, सांस्कृतिक संस्था आदी सुख सुविधा विकसित करण्यावर भर देणं गरजेचं आहे. सरकारनं अगदी अतिदूरच्या परिसरापर्यंतदेखील वाहतूक व्यवस्था, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, सर्वसमावेशक तिकिट व्यवस्था तसंच रेल्वे स्थानकांजवळ सुंदर सार्वजनिक ठिकाणं निर्माण करण्याकडं लक्ष दिलं पाहिजे, असं या अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे.

‘मेट्रो स्थानकांभोवती उत्तम वाहतूक व्यवस्था विकसित होईल याकडं आम्ही लक्ष पुरवत असून, आगामी मेट्रो स्थानकांसाठी आम्ही एक मल्टी-मॉडेल एकात्मिक आराखडादेखील तयार केला असल्याचं, एमएमआरडीएच्या (MMRDA) एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत महाराष्ट्रात Double Mutant Variant; काय आहे हा प्रकार?

मुंबईचे अर्बन सेंटरचे (Mumbai Urban Centre) मुख्य संचालक पंकज जोशी म्हणाले, ‘रोजगार निर्मितीमध्ये वाहतूक व्यवस्था हा सर्वांत महत्त्वाचा घटक असतो, परंतु याबरोबर इतर घटकांवरदेखील काम करण्याची आवश्यकता असते. यामध्ये परवडणारी घरं, योग्य धोरण आखणी, नोकरीतील समाधान अशा अनेक घटकांचा समावेश आहे.’

First published: March 25, 2021, 7:33 AM IST

ताज्या बातम्या