मुंबई, 17 नोव्हेंबर: सध्या बॉलिवूडची क्वीन अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आहे. त्यातच शिवसेना आणि कंगना यांचं आधीपासून वाकडं आहे. अशातच आज मुंबईच्या (Mumbai Mayor) महापौर किशोरी पेडणेकर ( Kishori Pednekar) यांनी कंगनाच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भयानक कंगना ही राक्षसी वृत्तीची बाई आहे, अशा कठोर शब्दात किशोरी पेडणेकर यांनी कंगनाला टोला लगावला आहे. महापौर एवढं बोलून थांबल्या नाहीत तर सकाळी सकाळी बाईचं नाव घेऊ नये, असंही म्हटलं आहे. आज शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांचा 9वा (Balasaheb Thackeray Death Anniversary) स्मृतीदिन आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी किशोरी पेडणेकर उपस्थित होत्या. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी कंगना रणौतनं केलेल्या वक्तव्यावर भाष्य केलं आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी रीगल
— Kishori Pednekar (@KishoriPednekar) November 17, 2021
सिनेमाजवळील बाळासाहेब ठाकरे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला आज पुष्पहार अर्पण केला.
याप्रसंगी @ianildesai ji ,@AGSawantji , @AdvSuhasWadkar उपस्थित होत्या. pic.twitter.com/vDtdaiHgig
कंगना ही भयानक राक्षसी वृत्तीची बाई असल्याचं किशोरी पेडणेकरांनी म्हटलं आहे. तर कंगना एकावर एक नीच कळस दिवसेंदिवस करत असल्याचा हल्लाबोल ही महापौरांनी केला आहे. त्यामुळे सकाळी सकाळी बाईचं नाव घेऊ नये, अशा शब्दात किशोरी पेडणेकर यांनी कंगनावर निशाणा साधला आहे. कंगना रणौतचं वादग्रस्त वक्तव्य कंगनाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत ‘भारताला 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे स्वातंत्र्य नसून ती भीक होती, खरे स्वातंत्र्य हे 2014 साली मिळाले’ असे वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यानंतर देशभरातून यावर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत आणि यावरुन वादंग निर्माण झाला. तसेच तिला मिळालेले पुरस्कार परत घ्यावेत अशी देखील मागणी होताना दिसत आहे. हेही वाचा- मोठी बातमी: अभिनेता अनिकेत विश्वासरावची पत्नीला मारहाण, गुन्हा दाखल कंगनाच्या वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया कंगनानं देशाचा अपमान केला आहे. तिला असे वक्तव्य करायची सवयच आहे. तिच्या या वक्तव्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे कंगनानं देशाची माफी मागावी. तिचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले जावेत, असा हल्लाबोल संजय राऊतांनी कंगनावर केला होता. हेही वाचा- पुणे: रेल्वेत नोकरी लावण्याच्या बहाण्यानं लुटलं; महिला टीसीनंच घातला लाखोंचा गंडा कंगनाला तरी काही लाज लज्जा…माफी तरी मागावी. ज्या वृत्तवाहिनीच्या व्यासपीठावर हा सगळा सोहळा झाला तिथे सर्वांनी टाळ्या वाजवल्या हा निर्लज्जपणाचा कळस असल्याची टीकाही संजय राऊतांनी केली.

)







