मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात गुन्हा दाखल, पत्नीची घरगुती हिंसाचार मारहाण केल्याची तक्रार

अभिनेता अनिकेत विश्वासराव विरोधात गुन्हा दाखल, पत्नीची घरगुती हिंसाचार मारहाण केल्याची तक्रार

मराठी सिनेसृष्टीतून एक मोठी बातमी समोर येतेय.

मराठी सिनेसृष्टीतून एक मोठी बातमी समोर येतेय.

मराठी सिनेसृष्टीतून एक मोठी बातमी समोर येतेय.

  • Published by:  Pooja Vichare

पुणे, 17 नोव्हेंबर: मराठी सिनेसृष्टीतून एक मोठी बातमी समोर येतेय. प्रसिद्ध मराठी कलाकार अनिकेत विश्वासराव (Aniket Vishwasrao) याच्यविरोधात कौटुंबिक हिंसाचार (domestic violence) आणि मारहाणीचा गुन्हा दाखल झाला आहे. अलंकार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. अनिकेतची पत्नी स्नेहा चव्हाणनं (Sneha Chavan) तक्रार दाखल केल्यानंतर हा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अनिकेतसह सासू, सासरे यांच्यावर पत्नी स्नेहानं कौटुंबिक हिंसाचार आणि मारहाण केल्याची तक्रार दाखल केली. तक्रार दाखल केल्यानंतर या प्रकरणी पुण्यातल्या अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

स्नेहानं अनिकेतसह सासरे चंद्रकांत विश्वासराव आणि सासू अदिती विश्वासराव या तिघां विरोधात गंभीर आरोप केले आहेत.

पती अनिकेत विश्वासरावनं 10 डिसेंबर 2018 ते 2 फेब्रुवारी 2021 या तीन वर्षांच्या काळात सिनेसृष्टीत आपल्यापेक्षा पत्नीचं नाव मोठं होईल या भीतीपोटी वेळोवेळी नातेवाईकांसमोर अपमानास्पद वागणूक दिल्याचं फिर्यादी स्नेहानं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. तसंच पतीनं गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न देखील केल्याच स्नेहानं आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे.

First published:

Tags: Marathi cinema, Marathi entertainment