26/11 हल्ल्यात कसाबला शिक्षा देणारे मुख्य साक्षीदार सापडले मुंबईच्या रस्त्यावर, कुटुंबियांनी काढलं घराबाहेर

26/11 हल्ल्यात कसाबला शिक्षा देणारे मुख्य साक्षीदार सापडले मुंबईच्या रस्त्यावर, कुटुंबियांनी काढलं घराबाहेर

कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल यांनी कामा हॉस्पिटलच्या बाहेर गोळीबार सुरू केला तेव्हा हरिश्चंद्र यांना गोळीही लागली होती.

  • Share this:

मुंबई, 06 मे : हरिश्चंद्र श्रीवर्धनकर नावाचे 60 वर्षांचे इसम मुंबईच्या रस्त्यांवर झोपलेले काही दिवसांपूर्वी दिसून आले. जवळच असलेल्या दुकानदाराची नजर त्यांच्यावर पडली, त्यांनी हरिश्चंद्र यांची मदतही केली. त्यानंतर कळलं ही हे कोणी साधं व्यक्तीमत्व नव्हे तर ते एक साक्षीदार आहे. ते ही 26/11 दहशतवादी हल्ल्याचे. हरिश्चंद्र हे एकमेव होते, ज्यांनी 26/11चा दहशतवादी अजमल कसाब याला ओळखले. एवढेच नाही तर या हल्ल्यात त्यांना गोळीही लागली होती, त्यात ते थोडक्यात बचावले.

Indiatodayने दिलेल्या वृत्तानुसार, हरिश्चंद्र श्रीवर्धनकर यांना कुटुंबियांनी घरातून बाहेर काढलं होतं. राहायला जागा आणि अन्न नसल्यामुळं हरिश्चंद्र गेले कित्येक दिवस मुंबईच्या रस्त्यांवर होते. याचवेळी Saath Rasta shopचे मालक डीन डिसुजा यांनी त्यांची मदत केली.

वाचा-देशात कोरोना वॅक्सीन ट्रायल लवकरच, PM मोदींनी घेतला आढवा

डिसुजा यांनी हरिश्चंद्र यांना पहिले तेव्हा त्यांनी प्रकृती खराब होती. त्यामुळं त्यांनी निराधारांसाठी IMCares नावाच्या स्वयंसेवी संस्था चालवणारे त्यांचे मित्र गायकवाड यांना बोलावले. गायकवाड यांनी Indiatodayला “आम्ही श्रीवर्धनकरांना जे अन्न दिले ते त्याने खाल्ले नाही. त्यांना आंघोळ घातल्यानंतर स्वच्छ कपडे दिले. ते सतत 'हरिश्चंद्र', 'बीएमसी' आणि 'महालक्ष्मी' अशी नावे घेत होते. आम्हाला वाटले की त्याचे काही नातेवाईक इकडेच राहतात'. त्यानंतर गायकवाड यांनी बीएमसी कॉलनीमध्ये हरिश्चंद्र यांच्याबाबत चौकशी केली, त्यावेळी त्यांना कळले की हरिश्चंद्र एक साक्षीदार आहेत. 26/11 दहशतवादी हल्ल्यात त्यांनी महत्त्वाची भुमिका बजावली होती. त्यानंतर त्यांनी पोलिसांची मदत घेतली.

वाचा-4 हजारांच्या लॉटरीवर ड्रायव्हरनं जिंकले 2 कोटी, 50 वर्षांत केली नाही इतकी कमाई

गायकवाड म्हणाले, "खेदाची बाब म्हणजे त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांची काळजी घ्यावीशी वाटत नाही आणि त्यांना आश्रमात दाखल करण्यास त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. लोकांनी पुढे यावे आणि या विलक्षण व्यक्तीस मदत करावी अशी आमची इच्छा आहे. त्याने एका दहशतवाद्याला शिक्षा करण्यास मदत केली".

वाचा-पाकिस्तानच्या 'या' क्रिकेटपटूला बायोपिकसाठी लीड रोलमध्ये हवा आहे सलमान खान

श्रीवर्धनकर यांनी 26/11च्या हल्ल्यात एका दहशतवाद्याला आपल्या बॅगने मारले होते. श्रीवर्धनकर हे अजमल कसाबला ओळखणार्‍या मुख्य साक्षीदारांपैकी एक होते. कसाब आणि त्याचा साथीदार अबू इस्माईल यांनी कामा हॉस्पिटलच्या बाहेर गोळीबार सुरू केला तेव्हा हरिश्चंद्र यांना गोळीही लागली होती.

First Published: May 6, 2020 09:57 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading