मुंबई, 6 मे : सध्या सगळीकडेच बायोपिक सिनेनमांची चलती आहे. त्यातही एखाद्या खेळाडूच्या जीवनावर बायोपिकची निर्मिती होत असेल तर त्याची चर्चा तर होतेच. आतापर्यंत बॉलिवूडमध्ये सचिन तेंडूलकर, मेरी कोम, महेंद्रसिंग धोनी, मिल्खा सिंग या खेळाडूंच्या जीवनावर बायोपिक आले आहेत. भविष्यातही झुलन गोस्वामी, मिताली राज, सायना नेहवाल यांच्या जीवनावर बायोपिकची तयारी केली जात आहे. अशात एका पाकिस्तानी क्रिकेटपटूनं सुद्धा त्याच्यावर बायोपिक तयार झाल्यास त्यात लीड रोल सलमान खाननं करावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.
पाकिस्तानचा दिग्गज क्रिकेटर शोएब अख्तर यानं त्याच्यावर बायोपिक तयार झाल्यास त्यात शोएबची भूमिका सलमान खाननं साकारावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. शोएब हा सलमान खानचा खूप मोठा चाहता आहे. त्यानं अनेकदा सलमानचं कौतुक केल्याचं पाहयला मिळालं आहे. 2016 मध्ये सलमान आणि शोएब दुबईमध्ये एकमेकांना भेटले होते. ज्याबद्दल शोएबनं त्याच्या ट्वीटरवरून माहिती दिली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा सलमाननं आपल्या बायोपिकमध्ये लीड रोल करावा अशी इच्छा शोएबनं व्यक्त केली आहे.
'मी 3 वर्ष दारू प्यायले नाही पण...' पूजा भटनं सांगितलं लोकांच्या आक्रमकतेचं कारण
पाकिस्तानी पत्रकार साज सादिकनं शोएबचं हे वक्तव्य आपल्या ट्विटरवर ट्वीट केलं आहे. शोएब अख्तर म्हणाला जर माझ्यावर बायोपिक बनला तर त्यात लीड रोल सलमान खाननं करावा अशी माझी इच्छा आहे.
Shoaib Akhtar "If ever my biopic is made, I want Salman Khan to play the lead in it"
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) May 4, 2020
या अगोदर भारतीय क्रिकेटर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्यावर बायोपिक तयार करण्यात आले आणि ते बॉक्स ऑफिसवर तुफान चालले सुद्धा. याशिवाय लवकरच भारतीय क्रिकेट टीमनं 1983 मध्ये जिंकलेल्या वर्ल्डकपवर '83' हा सिनेमा येत आहे ज्यात अभिनेता रणवीर सिंह क्रिकेटर कपिल देव यांची भूमिका साकारत आहे.
(संपादन- मेघा जेठे)
मुंबईत नाही तर या ठिकाणी असेल Bigg Boss चं घर, पहिल्या स्पर्धकाचं नावही आलं समोर
या ठिकाणी झालं होतं नीतू-ऋषी कपूर यांचं लग्न, 40 वर्षांनी समोर आला UNSEEN PHOTO