मुंबई, 1 डिसेंबर : पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाची धूळ चारणाऱ्या ममता बॅनर्जी मुंबई दौऱ्यावर (Mamata Banerjee Mumbai tour) आहेत. काल ममता बॅनर्जी यांनी शिवसेना नेत्यांची भेट घेतली (Mamata Banerjee meeting with Shiv Sena leaders) त्यानंतर आज दुपारी शरद पवारांसोबत त्यांची बैठक (Mamata Banerjee Sharad Pawar Meeting) आहे. आपल्या दौऱ्यात ममता बॅनर्जी या काँग्रेस नेत्यांची भेट घेणार नव्हतते हे स्पष्ट होते मात्र, आज एका कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर थेट हल्लाबोल केला आहे. (Mamata Banerjee targets Rahul Gandhi) नेमकं काय म्हणाल्या ममता बॅनर्जी ? ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या परदेशवारीवरुन नाव न घेता निशाणा साधला आहे. ‘जर तुम्ही अर्ध्याहून अधिक काळ जर परदेशात राहिलात तर राजकारण कसे काय कराल?’ असा सवाल ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे. वाचा : Aaditya Thackeray आणि Mamata Banerjee यांची भेट गुप्त का ठेवली? काही कटकारस्थान आहे का? भाजपचे सवाल काँग्रेस हा देशातील सर्वात जुना पक्ष आहे. मात्र, असे असले तरी गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसची वाताहत झाल्याचं पहायला मिळत आहे. देशातील विधानसभा निडणुका असोत किंवा देशातील लोकसभा निवडणुका असोत सर्वत्र काँग्रेस पक्षाची वाताहत झाल्याचं पहायला मिळत आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून काँग्रेस अध्यक्षपदावरुनही वाद सुरू असून एक ठोस नेत्रृत्वही नाहीये. या सर्वांमुळे भाजपला रोखण्यासाठी प्रबळ विरोधी पक्षच नसल्याचं दिसत आहे. याच मुद्द्यावरुन ममता बॅनर्जी यांनी राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. … तर मी काँग्रेस विरुद्ध निवडणूक लढवू शकते ममता बॅनर्जी म्हणाल्या, जर पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस तृणमूल काँग्रेसच्या विरोधात निवडणूक लढवू शकते तर मी गोव्यात काँग्रेसच्या विरोधात का निवडणूक लढू शकत नाही? असा सवालही ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला. वाचा : आदित्य ठाकरे-संजय राऊत यांनी घेतली ममतादीदींची हॉटेलमध्ये भेट! भाजपचा पराभव करणे सोपे ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या, जर सर्व प्रादेशिक पक्ष एकत्र आले तर भाजपचा पराभव करणे खूप सोपे आहे. जर भाजप सत्तेतून बाहेर पडला आणि आपण या देशाची सेवा करू शकलो तर सर्वसामान्यांच्या विरोधात कोणतेही कठोर कायदे होणार नाहीत. सर्वजण एकत्र मिळून मैदानात उतरल्यास भाजपचा पराभव नक्कीच होईल. भारतीय जनता पक्षाच्या काळात पत्रकारही सुरक्षित नाहीयेत. ज्या-ज्या ठिकाणी भाजप आहे तिथे माध्यमेही सुरक्षित नाहीत असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या. आगामी उत्तरप्रदेशच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच मोदी सरकारने पेट्रोल, डिझेलवरील करात कपात करण्याचा निर्णय घेतला. इतकेच नाही तर वादग्रस्त ठरलेले तिन्ही कृषी कायदेही त्यासाठीच मोदी सरकारने मागे घेतले असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.