मुंबई, 30 नोव्हेंबर : राजकारणात ‘शत्रूचा शत्रू तो आपला मित्र’ अशी म्हणं आहे आणि याचा प्रत्यय पुन्हा एकदा मुंबईत (mumbai) पाहण्यास मिळाला आहे. पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपला धुव्वा उडवणाऱ्या ममता बॅनर्जी (mamata banerjee) मुंबई दौऱ्यावर आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात दाखल असल्यामुळे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांनी पंचतारांकित हॉटेलमध्ये (mumbai trident hotel) जाऊन ममतादीदींची भेट घेतली. भाजपच्या कट्टर शत्रू असलेल्या ममतादीदी मुंबईत आल्या आहेत. ठरल्याप्रमाणे ममतादीदी या राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट ठरली होती. पण राज शिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची ट्रायडंट हाँटेलमध्ये जाऊन ममतादीदींची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर HN रिलायन्स हाँस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे दोन नेते पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बँनर्जी यांची सदिच्छा भेट घेतली. हेलिकॉप्टरमध्ये एखादा गडी असता तर…’, पवारांनी महिला पायलटचा किस्सा सांगितला देशातला कोणताही बडा नेता आला तर उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी ते हमखास ‘मातोश्री’ची पायरी ओलांडत होता. पण, गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तब्येत खालवली आहे. त्यांना मानेचा त्रास होत असल्यामुळे त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुद्धा पार पडली. गेल्या दोन दिवसांपासून ते शासकीय कार्यक्रमांना हजेरी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी होत आहे. प्रवाशांना घेऊन जात होतं विमान; अचानक स्क्रीनवर दिसू लागले रक्ताचे थेंब, आणि… विशेष म्हणजे, 2017 मध्ये सुद्धा ममतादीदी या मुंबईच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीच्या बाहेर जाऊन त्यांची घेतली होती. मोदी विरोधासाठी उद्धव ठाकरेंनी ‘मातोश्री’बाहेर पडून हॉटेल ट्रायडंटमध्येच ममता दीदींची भेट घेतली होती. ममतादीदी घेणार शरद पवारांची भेट दरम्यान, आज संध्याकाळी ममता बॅनर्जी यांनी सिद्धीविनायक मंदिराला दर्शनासाठी आल्या होत्या. यावेळी ममतादीदींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना केली. तसंच, ‘जय मराठा, जय बांगला’ असा नाराही त्यांनी दिला. आज मुख्यमंत्र्यांच्य भेटीनंतर उद्या दुपारी 1.45 वाजेच्या सुमारास वाय बी चव्हाण सेंटर येथे सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तींसोबत बैठकीला हजर राहणार आहे. त्यानंतर दुपारी 3.15 वाजेच्या सुमारास राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवास्थानी भेट घेणार आहे. त्यानंतर रात्री संजय राऊत यांच्या मुलीच्या लग्नाच्या Reception सोहळ्यात हजर राहणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.