मुंबई, 1 डिसेंबर : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या मुंबई दौऱ्यावर आहेत. काल मुंबईत दाखल झालेल्या ममता बॅनर्जी यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. मात्र, आता या भेटीवरुन राजकारण चांगलंच तपाल्याचं दिसत आहे. ममता बॅनर्जी यांच्यासोबत आदित्य ठाकरे यांच्या भेटीवर भाजपने प्रश्न उपस्थित केले आहेत. या भेटीबाबत गुप्तता का बाळगण्यात आली? असा सवालही भाजपने उपस्थित केला आहे. (BJP arise question on Mamata Banerjee Aaditya Thackeray meeting)
बंद दाराआड काय चर्चा झाली?
मंत्री आदित्य ठाकरे सांगत आहेत की, मुख्यमंत्र्यांच्या वतीने मी ममता बॅनर्जी यांना भेटत आहे. कौटुंबिक संबंध असल्याचं कारण देऊन नेमकं काय लपवलं जातंय? ममता बॅनर्जी यांच्यासोबत झालेल्या बैठकीबाबत गुप्तता का बाळगली जातेय? असा सवालही आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
काल आदित्य ठाकरे आणि ममता यांची भेट गुप्त का ठेवली? हे काही कट कारस्थान आहे का? कुणी ही आले की यांचे कौटूंबिक नाते. आमच्या मनांत शंका आहे. की त्या इथल्या उद्योगांना बंगालमध्ये घेवून जाण्यासाठी आले आहे. आमचा उद्योग वाढीला विरोध नाही. पण सत्ताधारी पक्ष ते पळवून न्यायाला मदत करत आहेत असंही आशिष शेलार म्हणाले.
वाचा : आदित्य ठाकरे-संजय राऊत यांनी घेतली ममतादीदींची हॉटेलमध्ये भेट!
अनधिकृतपणे पश्चिम बंगालमध्ये राहणाऱ्या बांगलादेशींवर कारवाई न करण्याची भूमिका तेथील टीएमसीने घेतली आहे. अशा बांगलादेशींना भारतात स्थान देणाऱ्या आणि बांगलादेशी समर्थकांसोबत तुमचं कौटुंबिक नातं काय आहे? असा सवालही भाजपने उपस्थित केला आहे. तसेच उद्यापासून बांग्लादेशींवरची कारवाई थांबवायचे आश्वासन आदित्य ठाकरे यांनी दिले का? असंही आशिष शेलार यांनी म्हटलं आहे.
यापूर्वी आशिष शेलार यांनी ट्विटही सकाळी केले होते. त्यात म्हटलं होतं, "ममता दिदी महाराष्ट्रात आल्या आहेत त्यांचे जोरदार स्वागत सरकार आणि सरकारी पक्ष करतोय. पाहुण्यांचे स्वागत करणे ही परंपराच आहे त्याबद्दल आक्षेप घ्यावा असे काही नाही. पण.. महाराष्ट्रारातील उद्योगांना, दिदी पश्चिम बंगालमध्ये या असे आमंत्रण गेऊन ही त्या आहेत का? म्हणजे इथले उद्योग, व्यवसाय पश्चिम बंगालला घेऊन जाण्यास दिदींना शिवसेना मतद करतेय का? इथले उद्योग देऊन शिवसेनेला इथल्या तरुणाला फक्त वडापाव विकायलाच लावायचेय का?".
ममता बॅनर्जी घेणार शरद पवारांची भेट
ममता बॅनर्जी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत (Mamata Banerjee-Sharad Pawar Meeting). 2024 च्या लोकसभा निवडणुकीत तृणमूल केवळ पश्चिम बंगालपुरते मर्यादित राहणार नाही, असा स्पष्ट संदेश ममता बॅनर्जी यांनी गेल्या काही महिन्यांत दिला आहे. या अनुषंगाने त्यांची शरद पवारांसोबतची भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
मात्र, शरद पवार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीचा संदर्भ देत महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी काँग्रेसशिवाय एकजूट विरोधी पक्ष शक्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. ते म्हणाले, ममता दीदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत, त्या पवारसाहेबांना भेटणार आहेत. बैठकीनंतर त्या पत्रकारांना संबोधित करून चर्चेची माहिती देतील.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aaditya thackeray, Ashish shelar, BJP, Mamata banerjee