मुंबईत कहर! दिवसभरात 1104 कोरोना रुग्ण; Lockdown बद्दल अतिरिक्त आयुक्त काय म्हणाले वाचा...

मुंबईत कहर! दिवसभरात 1104 कोरोना रुग्ण; Lockdown बद्दल अतिरिक्त आयुक्त काय म्हणाले वाचा...

Coronavirus Mumbai Updates: राज्यात 24 तासांत 8998 नवे कोरोनारुग्ण दाखल झाले असून 60 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत नव्या रुग्णांची हीच संख्या 1104 पर्यंत वाढली.

  • Share this:

मुंबई, 4 मार्च: मुंबईसह महाराष्ट्रात कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या (Coronavirus latest updates Maharashtra) पुन्हा गुणाकार पद्धतीने वाढू लागली आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाचा ग्राफ चढताच राहिला आहे. गुरुवारी मुंबईत तर नव्या रुग्णसंख्येचा कहर (Coronavirus Mumbai lockdown news) झाला. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने गुरुवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 24 तासांत 8998 नवे कोरोनारुग्ण दाखल झाले असून 60 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत नव्या रुग्णांची हीच संख्या 1104 पर्यंत वाढली.

गेले तीन आठवडे मुंबई (Mumbai) शहरामध्ये कुरणा रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली आहे. दररोज तीनशे पर्यंत खालावलेली कॉरोना रुग्णाची संख्या आता हजाराच्या वर जाऊ लागलेली आहे. गुरुवारी दिवसभरात 1104 रुग्ण सापडले. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM uddhav Thackeray on corona lockdown) यांनी केलेलं फेसबुक लाईव्ह अनेक लोकांच्या मनात धडकी भरवणारा होतं. पुन्हा एकदा लॉकडाउनचा सामना करावा लागेल का अशी भीती लोकांना वाटू लागली होती. "मी परिस्थिती बघेन आणि लॉकडाउनचा निर्णय त्यानंतर घेईन", असं वक्तव्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. तेव्हापासून करोनाच्या रुग्णांच्या संख्येत फारसा फरक पडलेला नाही, उलट मुंबईत तर रुग्णसंख्या वाढलीच आहे. त्यामुळे मुख्यमंत्री नेमका काय निर्णय घेतील याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं.

आता मात्र मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाचे प्रमुख आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त म्हणून काम करणारे सुरेश काकानी यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. 'मुंबईत लॉकडाउन करण्याची वेळ येईल असंं वाटत नाही', असं ते म्हणाले.

हे वाचा-  मीरा-भाईंदरमध्ये लंडनसारखाच फॉर्म्युला वापरत कोरोनाबाबत कडक निर्बंध

मुंबईत 29 खाजगी रुग्णालयाला केंद्र शासनाने लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. त्यापैकी 16 खाजगी रुग्णालयात कोरोनाचे लसीकरण सुरू करण्यात येणार आहे. महापालिकेने आवाहन केलं आहे की नागरिकांनी आधी नोंदणी करावी आणि नंतर केंद्रावर जाऊन लस घ्यावी. त्यामुळे गर्दी टाळता येईल आणि गैरसोय कमी होईल. रुग्णालयात नोंदणी करण्याची सोय आहे. त्यामुळे आधी नोंदणी करावी.

काही खाजगी रुग्णालयं मोफत लसीकरण करत आहेत. जिथे मोबदला घेवून लसीकरण केलं जात आहे तिथे आधी नोंदणी करून केंद्र शासनाच्या अकाउंटमध्ये पैसे जमा करून त्याची रिसीट दाखवावी लागेल. गोंधळ होऊ नये म्हणून मोफत आणि मोबदला घेवून लसीकरण करणारी रुग्णालय वेगवेगळी केली आहे. खाजगी रुग्णालयातील आरोग्य सेवकांना महापालिका मोफत लसीकरण करणार आहे.

जरूर वाचा -  ...तर मला कोरोना लस घेता येईल का? लसीकरणाबाबत तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर

मी मुंबई क्या एम, आर साऊथ, आर सेंट्रल, के वेस्ट, एच वेस्ट वॉर्ड ची पाहणी केली आहे, असं अतिरिक्त आयुक्त सुरेश काकानी यांनी सांगितलं.

मुंबईतले कोरोनारुग्ण इमारतीतले

मुंबईत 97-98 टक्के रुग्ण हे ईमारतीत राहणारे आहेत. तर केवळ 2-3 टक्के लोक हे दाटीवाटीच्या वस्तीत राहणारे आहेत. सध्या लॉकडाउनची वेळ आपल्यावर येईल असं वाटतं नाही. युरोपियन देशातून, आखाती देशांतून, दक्षिण आफ्रिका आणि ब्राझील मधून येणाऱ्या लोकांना त्याची टेस्ट निगेटिव्ह असली तरी 7 दिवस संस्थात्मक क्वारंटाइन व्हावं लागेल आणि त्यानंतर ही 7 दिवस घरी क्वारंटाइन व्हावं लागेल, अशी माहितीही अतिरिक्त आयुक्तांनी दिली.

First published: March 4, 2021, 8:46 PM IST

ताज्या बातम्या