मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

मीरा-भाईंदरमध्ये लंडनसारखाच फॉर्म्युला वापरत कोरोनाबाबत कडक निर्बंध, समारंभात ही चूक केल्यास होणार मोठा दंड

मीरा-भाईंदरमध्ये लंडनसारखाच फॉर्म्युला वापरत कोरोनाबाबत कडक निर्बंध, समारंभात ही चूक केल्यास होणार मोठा दंड

COVID-19 Restrictions: मीरा-भाईंदरवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. याठिकाणी जर तुम्ही एखादं लग्नकार्य किंवा एखादा कार्यक्रम हाती घेणार आहात, तर लक्ष द्या.

COVID-19 Restrictions: मीरा-भाईंदरवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. याठिकाणी जर तुम्ही एखादं लग्नकार्य किंवा एखादा कार्यक्रम हाती घेणार आहात, तर लक्ष द्या.

COVID-19 Restrictions: मीरा-भाईंदरवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. याठिकाणी जर तुम्ही एखादं लग्नकार्य किंवा एखादा कार्यक्रम हाती घेणार आहात, तर लक्ष द्या.

मीरा-भाईंदर, 04 मार्च: जगभरात कोरोनाची (Coronavirus) दुसरी लाट आल्याचं चित्र आहे. त्यामुळे नव्याने निर्बंध लावण्यात आले आहेत. ब्रिटनमध्ये कोव्हिड-19 च्या नवीन व्हेरियंटचा (Corona New Strain) प्रसार रोखण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. लंडनमध्ये ही खबरदारी घेत लॉकडाऊनचे कडक निर्बंध लावले आहेत. भारतातही लग्नसराईमध्ये खूप गर्दी होते असते. आता उपायोजना म्हणून लंडनमध्ये नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणात दंड आकारला जात आहे.  काहीसा असाच प्रकार आता मीरा भाईंदर महापालिका प्रशासनाकडून पाहायला मिळतो आहे. मीरा-भाईंदरवासीयांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. याठिकाणी जर तुम्ही एखादं लग्नकार्य किंवा एखादा कार्यक्रम हाती घेणार आहात, तर लक्ष द्या. लग्नासाठी तुम्ही 100 पेक्षा अधिक पाहुण्यांना बोलावलं असेल किंवा 100 पेक्षा अधिक लोक जर येणार असतील तर मग त्यापायी तुम्हाला दंडाची रक्कम भरावी लागेल. इतकंच नाही तर ज्या हॉलमध्ये पाहुण्यांची उपस्थिती शंभरपेक्षा असेल त्या हॉलच्या मालकालाही थोडाथोडका नाही तर 25 हजार रुपयांचा दंड बसणार आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त दिलीप ढोले यांनी पदभार स्वीकारताच आदेश काढला आहे. त्यांनी या आदेशात असे म्हटले आहे की एखादी संस्था, कार्यालयं, मॉल किंवा खाजगी कंपन्या कोरोना काळातील सरकारने आणि पालिकेने ठरवून दिलेल्या नियमांचे उल्लघंन करत असतील त्यांना  25 हजार रुपये दंड ठोठवावा. जर पुन्हा दुसऱ्यांदा तोच गुन्हा केला असं आढळलं तर सदर संस्था, कार्यालयं, मॉल,  खाजगी कंपन्या सरळ सरळ सात दिवसांसाठी सील केल्या जातील. (हे वाचा-चिंताजनक! राज्यात कोरोनाचा कहर, आढळले चार महिन्यातील सर्वाधिक रूग्ण) मिरा भाईंदर महानगरपालिकेचे नवीन नियुक्त झालेले आयुक्त दिलीप ढोले यांनी आपल्या पदाचा स्वीकार केल्यानंतर दुपारी आयुक्त दालनात कोरोना लसीकरण आणि उपाययोजना याबाबत आढावा बैठक घेतली. या बैठकीत मंगल कार्यालये, ऑफिस, मॉल वर 25 हजार रुपये दंड लावण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला. लग्न हॉल, मॉल, सिनेमागृह, बाजार आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही यांची दक्षता घेण्यासाठी आणि सदर नियमावलीचे उल्लघंन करणाऱ्या व्यक्तीवर रु 500/- दंड आकारण्यासाठी आता पालिका आणि पोलीस हे एकत्रित काम करतील. मुंबईच्या वेशीवर असणाऱ्या मीरा भाईंदर महानगरपालिकेतील कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी तयार केलेले नियम हे मुंबई पेक्षा अधिक कठोर आहेत. मुंबईत मास्क न घातल्यास दोनशे रुपये दंड भरावा लागतो मुंबईत पण तोच मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रामध्ये तुमच्या तोंडाला मास्क लावलेला आढळला नाही तर मात्र पाचशे रुपये तुम्हाला भरावे लागतात. (हे वाचा-COVID-19: विद्यापीठानंतर आता महापालिकेतील 80 कर्मचारी पॉझिटिव्ह, जिल्ह्यात खळबळ) मीरा भाईंदरमध्ये बुधवारी जवळपास 94 ऑफिस, मॉल्स, मंगल कार्यालयाची पाहणी करण्यात आली. ज्यात 2 कार्यालयांवर तर 1 रेस्टॉरंटवर कारवाई करण्यात आली. तर मास्क न घालून फिरणाऱ्या नागरिकांकडून 28 हजार 500 रुपये दंड वसूल करण्यात आला. सध्या मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात बुधवारी 69 जण करोनाबाधित आढळले. तर आतापर्यंत 27 हजार 256 जण बाधित आढळले असून आतापर्यंत 804 जणांचा मृत्यू झाला आहे. मीरा रोड परिसरात सगळ्यात जास्त करोनाबाधित आढळले असून मिरा भाईंदर महापालिकेने आता नियम मोडणाऱ्याविरोधात कारवाई अधिक आक्रमक केली आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Corona, Corona hotspot, Corona spread, Corona updates, Corona vaccine, Coronavirus, Social distancing

पुढील बातम्या