• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मुंबई लोकलनं प्रवास करण्याची मुभा?, पालिकेचा विचार, लवकरच होणार बैठक

कोरोनाचे दोन्ही डोस घेतलेल्यांना मुंबई लोकलनं प्रवास करण्याची मुभा?, पालिकेचा विचार, लवकरच होणार बैठक

Mumbai local Train: काही महिन्यांपासून मुंबई लोकल ट्रेनची दारं सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे. सर्वच जण लोकल ट्रेन कधी सुरु होणार हा एकच प्रश्न विचारत आहेत.

 • Share this:
  मुंबई, 10 जुलै: मुंबईत कोरोनाची दुसरी लाट (Second Wave) आटोक्यात येत आहे. मात्र काही महिन्यांपासून मुंबई लोकल ट्रेनची (Local train) दारं सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे लोकल ट्रेनचा प्रवास सर्वसामान्य (Local train for all) नागरिकांसाठी कधी सुरू होणार याकडे सर्वाचे लक्ष लागलं आहे. सर्वच जण लोकल ट्रेन कधी सुरु होणार हा एकच प्रश्न विचारत आहेत. या वाढत्या मागण्या लक्षात घेता मुंबई महापालिका (BMC) एक महत्त्वपूर्ण निर्णय घेणार आहे. लोकल सेवा सुरु करण्यासंदर्भात येत्या 15 जुलै रोजी एक महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत मुंबईकरांसाठी लोकल सुरू करण्यासह इतर निर्बंध आणि नियमांतही शिथिलता आणण्यासंदर्भात घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. लसीकरणाचे दोन डोस महत्त्वपूर्ण ठरतील दरम्यान कोरोना लसीचे दोन्ही डोस (corona vaccine) घेतलेल्या मुंबईकरांसाठी लोकल सेवा सुरु करण्याची शक्यता आहे. अशा नागरिकांना कार्यालयात आणि इतर ठिकाणी जाण्याची परवानगी देण्याचा विचार पालिका करत आहे. मुंबईत सध्या कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आहे. मात्र कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता असल्यानं राज्य सरकार निर्बंध शिथील करताना विचार करत आहे. (The people who have got two doses of corona vaccine) पालकमंत्री अस्लम शेख काय म्हणाले? ट्रेनमध्ये लोकांना कसं प्रवास करण्याची संधी देता येईल का, हॉटेल दुकानांची वेळ कशी वाढवता येईल, कपड्याची दुकानं कशी उघडता येईल हे पाहत आहोत. ट्रेनचा विचार करताना तिसऱ्या लाटेचा विचार करावा लागतोय, 100 टक्के लोकांना त्रास होतोय हे मान्य आहे. सगळ्या पॅरामीटरचा विचार करतोय. जोपर्यंत 50 ते 60 टक्के लोकांना लसीकरण होत नाही तोपर्यंत कठीण आहे. अशीही माहिती मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली आहे. हेही वाचा- बापरे! डेल्टानंतर आता कोरोनाचा नवा व्हेरिएंटचा भारतात शिरकाव, एकाचा मृत्यू विजय वडेट्टीवार म्हणाले लोकल ट्रेनबाबत कोणताही निर्णय विचारपूर्वकच घ्यावा लागणार आहे. त्यासाठी तज्ज्ञांशी चर्चा करणं अपेक्षित आहे. चर्चेनंतर जो काही निर्णय घेण्यात येईल याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः जनतेला देतील. दर शुक्रवारी टास्क फोर्सद्वारे राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला जातो. त्यानंतर निर्बंधांबाबत योग्य तो निर्णय घेतला जातो, असं राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे. हेही वाचा- डेल्टा + व्हेरिएंटपेक्षा धोकादायक असलेला 'लॅम्बडा' वाढवणार भारताची चिंता? सध्या राज्यात कोरोना स्थिती नियंत्रणात येत आहे. मात्र कोरोना विषाणूचा धोका अद्याप कमी झालेला नाही. दररोज नव्यानं कोरोनाबाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या अजूनही मोठी आहे. पहिल्या लाटेत जो कोरोना रुग्णांचा उच्चांक होता, त्या आकड्यावर सध्या कोरोना रुग्णांची संख्या स्थिरावली आहे. त्याचबरोबर कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा धोकाही वाढताना दिसत आहे. अशा स्थितीत वस्तुस्थितीचा योग्य आढावा घेतल्यानंतरचं निर्बंध हटवण्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: