• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • लोकलमधील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारचा नवा निर्णय, लागू होणार QR Code सिस्टीम

लोकलमधील अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारचा नवा निर्णय, लागू होणार QR Code सिस्टीम

Mumbai Local Train:काही प्रवासी फेक आयकार्ड (Fake ID) वापरुन लोकलमध्ये (Local Train) प्रवास करत असल्याचं उघड झालं आहे.

 • Share this:
  मुंबई, 28 जून: सद्यस्थितीत मुंबईत(Mumbai) कोरोना (Corona Virus) रुग्णांचा आकडा नियंत्रणात आहे. मात्र राज्यात आजपासून तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध (Lockdown) लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व सामान्य प्रवाशांसाठी मुंबईच्या लोकलचे( Mumbai Local) दरवाजे अजूनही बंदच आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलनं प्रवास करण्याची मुभा आहे. पण काही प्रवासी फेक आयकार्ड (Fake ID) वापरुन लोकलमध्ये (Local Train) प्रवास करत असल्याचं उघड झालं आहे. त्यामुळे लोकलमध्ये अनावश्यक गर्दी होत असल्याचंही दिसून येत आहे. आता ही गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकार नवी सिस्टीम लागू करण्याचा विचार करत आहे. फेक आयकार्ड वापरणाऱ्यांवर चाप बसण्यासाठी राज्य सरकार पुन्हा एकदा क्यूआर कोड असलेल्या पासची सिस्टीम लागू करण्याचा विचार करत आहे. या सिस्टीमला युनिवर्सल ट्रॅव्हल पास असंही म्हटलं जाईल. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड असलेला हा पास दिला जाईल. हेही वाचा- पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी घरात घुसून केली माजी SPO आणि त्यांच्या पत्नीची हत्या; मुलीची प्रकृती गंभीर सध्याचा रोजच्या प्रवाशांचा आकडा पाहता, मध्य रेल्वेवर तब्बल 18 लाखांच्या आसपास आणि पश्चिम रेल्वेवर तब्बल 12 लाखांवर प्रवासी लोकलनं प्रवास करतात. यापैकी जवळपास 50 टक्के प्रवासी बनावट आय कार्ड बनवून रेल्वे तिकीट मिळवत असल्याचा संशय आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्याची मुभा असूनही फेक आयकार्ड्स आणि विनातिकीट प्रवासी यामुळे लोकलमधील अनावश्यक गर्दी वाढत चालली आहे. कोणत्याही सरकारी संस्थेचा किंवा आरोग्य सेवेतील कर्मचारी असल्याचा फेक आयकार्ड बनवून काही प्रवाशी लोकलनं प्रवास करत आहेत. दिवसेंदिवस अशा प्रवाशांचा सुळसुळाट झाल्यानं राज्य सरकार आता पुन्हा क्यूआर कोड असलेली यंत्रणा राबवणार आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना क्यूआर कोड असलेले युनिवर्सल आयकार्ड्स देण्यात येतील आणि ते कार्ड असतील तरच रेल्वे स्टेशनवर प्रवेश मिळेल. या युनिवर्सल आयकार्ड कसं मिळवायचं यासाठी राज्य सरकारकडून खास पोर्टल देखील तयार करण्यात आलं आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: