मुंबई, 30 जुलै : मुंबईत रेल्वेच्या कुर्ला कारशेड मध्ये गेले काही दिवस एक प्रयोग सुरू होता. Covid रुग्णांपासून आरोग्यसेवकांना होणाऱ्या संसर्गाचा धोका लक्षात घेऊन त्यांची काही कामं रोबो करू शकेल का हे तपासलं गेलं आणि चक्क रेल्वे कर्मचाऱ्यांनी कारशेडमध्येच बनवा हा रक्षक रोबो.
रेल्वे कर्मचाऱ्यांनी बनवलेला हा रक्षक नावाचा रोबो रुग्णांच्या शरीराचं तापमान थर्मामीटरने तपासतो. पल्स रेट मोजतो. शिवाय प्रत्येक रुग्णाला हे करण्यापूर्वी सॅनिटायझर देऊन हातही स्वच्छ करायला सांगतो.
या रोबोच्या चाचणीचा हा VIDEO पाहा
क्या बात है रक्षक! कुर्ला कार शेडमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी बनलेला हा रक्षक रोबो पाहा. रुग्णांच्या शरीराचं तापमान, पल्स रेट असं सगळं मोजू शकतो आणि रुग्णांना जेवणही नेऊन देऊ शकतो.. #AtmaNirbharBharat #CoronaInIndia pic.twitter.com/P1z9aW2huS
— News18Lokmat (@News18lokmat) July 30, 2020
रक्षक रोबो रुग्णांना जेवणही नेऊन देतो. इतर काही वस्तूही त्यामुळे रोबोसोबत देता येतात. 10 किलोपर्यंत वजन उचलण्याची यात क्षमता आहे, असं रेल्वेच्या कर्माचाऱ्यांनी सांगितलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारतसाठी हाक दिल्यानंतर प्रेरणा घेत हा प्रकल्प सुरू झाला. रेल्वे कर्मचाऱ्यांनी रेल्वेच्या कारशेडमध्ये हा रोबो तयार केला, हे याचं विशेष. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या कल्पकतेचं आणि त्यांच्या दृष्टीचं कौतुक होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Coronavirus, Indian railway, Robot