जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / आशीर्वाद देण्यासाठी आली आणि 3 महिन्यांच्या मुलीचा जीवच घेतला; किन्नराच्या कृत्यामुळे परिसरात खळबळ

आशीर्वाद देण्यासाठी आली आणि 3 महिन्यांच्या मुलीचा जीवच घेतला; किन्नराच्या कृत्यामुळे परिसरात खळबळ

आशीर्वाद देण्यासाठी आली आणि 3 महिन्यांच्या मुलीचा जीवच घेतला; किन्नराच्या कृत्यामुळे परिसरात खळबळ

सर्वसाधारणपणे किन्नर घरी आशीर्वाद देण्यासाठी येतात, मात्र मुंबईत तर ती घरी आली आणि…

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9 जुलै: तृतीयपंथीय (crime news transgender) आशीर्वाद देताना आपण अनेकदा पाहतो. यापैकी अनेकजणं तर काही पैसे न घेता दिलखुलास शुभेच्छा आणि आशीर्वाद देतात. मात्र मुंबईतील कफ परेडमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पैसे दिले नाही म्हणून एका तृतीयपंथीयांने नवजात मुलीचं (New born Baby murder) अपहरण (Kidnapped) करून तिची हत्या केली. घरात पाळणा हलणं ही प्रत्येकाच्या कुटुंबासाठी अत्यंत आनंदाची बाब असते. बाळाची चाहुल लागताच घर आनंदाने प्रफुल्लित होतं. मात्र कफ परेडमध्ये राहण्याऱ्या चितकोट कुटुंबाला फार काळ हा आनंद घेता आला नाही. काही महिन्यांपूर्वी त्यांच्या घरात मुलीचा जन्म झाला होता. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. दरम्यान 8 जुलै रोजी सायंकाळी कन्नु दत्ता उर्फ कन्हैया दत्ता नावाची किन्नर घरी पोहोचली आणि कुटुंबाकडून मुलीच्या जन्मासाठी एक साडी, नारळ आणि 1100 रुपये मागू लागली. मात्र या कुटुंबाने पैसे देण्यास नकार दिला आणि तिला जाण्यास सांगितलं. हे ही वाचा- मुंबईतील बेसच्या कंडक्टरला शिकवला धडा; 13 वर्षांच्या मुलीसोबत करायचा ‘गंदी बात’ यामुळे नाराज झालेली कन्नू दत्ता या किन्नराने आपल्या अपमानाचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपली साथी सोनू काळेला सोबत घेतलं आणि रात्री उशिरा चितकोट कुटुंबाच्या घरी जाऊन 3 महिन्यांच्या मुलीचं अपहरण केलं. यानंतर आंबेडकर नगर भागातील खाडीमध्ये जाऊन या 3 महिन्याच्या लहानगीची हत्या केली. पोलिसांनी या प्रकरणात अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर हत्येचा प्रकार समोर आला. यानंतर कफ परेड पोलिसांनी किन्नर आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. या प्रकरणात चितकोट कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. तीन महिन्यांपूर्वीच त्यांच्या घरात लक्ष्मी आली होती. त्यामुळे घरात आनंदाचं वातावरण होतं. मात्र किन्नराला पैसे दिले नाही म्हणून तिने राग मनात ठेवला. आणि संधी साधून मुलीची हत्या केली. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात