मुंबई, 9 जुलै: मुंबईतील (Mumbai Special Court) एका विशेष न्यायालयाने अल्पवयीन मुलीशी सेक्सबाबत (Sex Talk) चर्चा करण्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला शिक्षा सुनावली आहे. शाळेत जाणाऱ्या एका 13 वर्षीय मुलीसोबत सेक्सबद्दल चर्चा करण्याच्या आरोपाखाली कंडक्टरला दोषी मानत एक वर्षांची शिक्षा सुनावली आहे. आठवीत शिकणाऱ्या एका विद्यार्थिनीने न्यायालयात याबाबत खुलासा केला. तिने सांगितलं की, सरकारद्वारा संचालित सिटी बस सेवेतून (BEST) ती दररोज शाळेत जात होती. ती एकमेव बस होती जी मुंबईच्या पूर्व उपनगरातून जात होती. (Mumbai Conductors dirty talk with 13 year old girl Special court sentenced to 1 year )
न्यायालयाने आरोपी चंद्रकांत सुदाम कोळी याला POCSO अॅक्टअंतर्गत दोषी मानलं आहे. सुरुवातील सुदाम कोळीला केवळ 12 दिवसांसाठी तुरुंगात पाठविण्यात आलं होतं. सुनावणीदरम्यान आरोपीला जामिन मिळाला होता. कोळीच्या वकिलांनी अपील दाखल करण्याबरोबरच शिक्षा कमी करण्यासाठी एक अर्ज केला होता.
हे ही वाचा-शिक्षिकेचं विद्यार्थ्यांसोबत घृणास्पद कृत्य, CCTV मध्ये रेकॉर्ड झाला VIDEO
काय आहे प्रकरण?
ही मुलगी बेस्ट (Best Bus) बसमधून दररोज सकाळी शाळेत जात होती आणि दुपारी घरी परतत होती. 2018 मध्ये ज्या दिवशी घटना घडली त्यादिवशी बसमध्ये 2 ते 3 जणं बसले होते. या दरम्यान बस कंडक्टर चंद्रकांत सुदाम कोळी तिच्या जवळ गेले आणि शेजारी बसले. कोळीने मुलीला सेक्स बद्दल माहिती आहे का ? असा सवाल केला. यावर मुलीने अशा प्रकारचे प्रश्न विचारू नका असं उत्तर दिलं. कंडक्टर काही वेळाने तिथून निघून गेला. मात्र थोड्या वेळाने तो पुन्हा तिच्या जवळ आला आणि सेक्सबद्दल प्रश्न विचारला. मुलीने पुन्हा त्याला हटकलं. आणि तिचा स्टॉप आल्यानंतर खाली उतरून निघून गेली. (Sexual harassment)
काही दिवसांनंतर जेव्हा मुलीने शाळेला जाण्यास नकार देऊ लागली तेव्हा तिच्या आईने याचं कारण विचारलं. मात्र तिने काहीच उत्तर दिलं नाही. आईने पीडित मुलीच्या मैत्रिणीला विचारल्यानंतर नेमकी माहिती समोर आली. यानंतर पीडित मुलीचे आई बस डेपोमध्ये गेली. तेथे मुलीने कोळीची ओळख पटवली. यानंतर पीडित मुलीच्या आईने पोलिसांना फोन केला आणि गुन्हा दाखल केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bus conductor, Crime news, Mumbai