मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /BMC नं घातली बकऱ्यांच्या कुर्बानीवर मर्यादा, आक्षेप घेणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

BMC नं घातली बकऱ्यांच्या कुर्बानीवर मर्यादा, आक्षेप घेणारी याचिका हायकोर्टाने फेटाळली

बकरी ईदनिमित्त (Bakri Eid) मुंबईच्या देवनार कत्तलखान्यात (Devnar slaughterhouse) जास्तीत जास्त 300 बकऱ्यांची (300 goats) कुर्बानी देता येईल, असा निर्णय मुंबई महापालिकेनं (BMC) घेतला आहे.

बकरी ईदनिमित्त (Bakri Eid) मुंबईच्या देवनार कत्तलखान्यात (Devnar slaughterhouse) जास्तीत जास्त 300 बकऱ्यांची (300 goats) कुर्बानी देता येईल, असा निर्णय मुंबई महापालिकेनं (BMC) घेतला आहे.

बकरी ईदनिमित्त (Bakri Eid) मुंबईच्या देवनार कत्तलखान्यात (Devnar slaughterhouse) जास्तीत जास्त 300 बकऱ्यांची (300 goats) कुर्बानी देता येईल, असा निर्णय मुंबई महापालिकेनं (BMC) घेतला आहे.

मुंबई, 21 जुलै : बकरी ईदनिमित्त (Bakri Eid) मुंबईच्या देवनार कत्तलखान्यात (Devnar slaughterhouse) जास्तीत जास्त 300 बकऱ्यांची (300 goats) कुर्बानी देता येईल, असा निर्णय मुंबई महापालिकेनं (BMC) घेतला आहे. या निर्णय़ाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात आक्षेप घेणारी याचिका न्यायालयानं (Mumbai High Court) फेटाळून लावली आहे. कोरोना काळात धार्मिक भावनेपेक्षा सार्वजनिक आरोग्याला अधिक प्राधान्य देणं गरजेचं आहे, असं सांगत हायकोर्टानं ही याचिका फेटाळून लावली.

कुर्बानीची परंपरा

मुंबईत बकरी ईदनिमित्त दरवर्षी देवनारच्या कत्तलखान्यात हजारो बकऱ्यांची कत्तल केली जाते. मात्र यावेळी कोरोनाचं सावट असल्यामुळे जास्तीत जास्त 300 बकरेच कापता येतील, अशी मर्यादा मुंबई महापालिकेनं निश्चित केली आहे. या निर्णयाला ‘अल कुरेश ह्यूमन वेलफेअर असोशिएशन’ आणि ‘ऑल इंडिया जमैतुल कुरेश’ या संघटनांनी आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. BMC नं घातलेली 300 ची मर्यादा मागे घेण्यात यावी आणि कमीत कमी 1000 बकरे कापण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी याचिकाकर्त्यांनी न्यायालयाकडे केली. मात्र न्यायालयाने ही मागणी करणारी याचिका फेटाळून लावत मुंबई महापालिकेचा निर्णय़ कायम ठेवला आहे.

काय म्हणाले न्यायालय?

सध्या कोरोनाच्या काळात आरोग्य हाच अग्रक्रम असणे गरजेचे आहे, असे न्यायालयाने म्हटले आहे. किती बकऱ्यांच्या कुर्बानीला परवानगी द्यायची, हा प्रशासनाचा प्रश्न असून त्यात न्यायालयाला हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसल्याचं स्पष्ट करताना केवळ धार्मिक भावना सुखावण्यासाठी आरोग्याच्या प्रश्नांवर तडजोड करता येणार नाही, असं न्यायालयानं म्हटलं आहे. सार्वजनिक हिताचा विचार करूनच आरोग्याबाबतचे नियम ठरवण्यात आले आहेत. केवळ एखाद्या समुदायाला बरं वाटावं, यासाठी या नियमांमध्ये कुठलीही तडजोड करता येणार नाही, असं सांगत मुंबई हायकोर्टाने ही याचिका फेटाळून लावली.

हे वाचा -कोरोनाबाधित तरुणांनं विमान प्रवासासाठी केला उपद्‍व्याप, एका चुकीमुळे फुटलं बिंग

महापालिकेनं सांगितलं कोरोनाचं कारण

दरम्यान, गेल्या वर्षीदेखील कोरोनाची पहिली लाट असल्यामुळे केवळ 50 बकऱ्यांच्या कत्तलीला परवानगी देण्यात आली होती. यंदाची परिस्थिती गेल्या वर्षीच्या तुलनेत बरी असल्यामुळे 300 बकऱ्यांच्या कत्तलीची परवानगी देण्यात आल्याचं मुंबई महापालिकेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. 21 आणि 22 जुलै हे दोन देशभरात बकरी ईद साजरी होत असून आरोग्याबाबत तडजोड होईल, अशी कुठलीही कृती करू नये, असं बीएमसीनं म्हटलं आहे.

First published:
top videos

    Tags: BMC, Mumbai high court