मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /IPL मध्ये संधी देतो सांगून तरुण खेळाडूंकडून लाखो रुपये उकळले, बड्या नावांचा प्रकरणात सहभाग

IPL मध्ये संधी देतो सांगून तरुण खेळाडूंकडून लाखो रुपये उकळले, बड्या नावांचा प्रकरणात सहभाग

भारतीय क्रिकेट विश्वातून घोटाळ्याची एक मोठी बातमी उघड झाली आहे. राज्य किंवा आयपीएल टीममध्ये संधी देतो असं सांगून तरुण क्रिकेटपटूंकडून पैसे उकळणारं एक रॅकेट समोर आलं आहे.

भारतीय क्रिकेट विश्वातून घोटाळ्याची एक मोठी बातमी उघड झाली आहे. राज्य किंवा आयपीएल टीममध्ये संधी देतो असं सांगून तरुण क्रिकेटपटूंकडून पैसे उकळणारं एक रॅकेट समोर आलं आहे.

भारतीय क्रिकेट विश्वातून घोटाळ्याची एक मोठी बातमी उघड झाली आहे. राज्य किंवा आयपीएल टीममध्ये संधी देतो असं सांगून तरुण क्रिकेटपटूंकडून पैसे उकळणारं एक रॅकेट समोर आलं आहे.

मुंबई, 6 ऑक्टोबर : भारतीय क्रिकेट विश्वातून घोटाळ्याची एक मोठी बातमी उघड झाली आहे. राज्य किंवा आयपीएल टीममध्ये संधी देतो असं सांगून तरुण क्रिकेटपटूंकडून पैसे उकळणारं एक रॅकेट समोर आलं आहे. या प्रकरणात अनेक दिग्गजांचा सहभाग असल्याची माहिती आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेला कोच कुलबीर रावतने आपण आठ ते नऊ खेळाडूंकडून या प्रकारची लाच घेतल्याची कबुली दिली आहे.

रावतने तपासाच्या दरम्यान सिक्किम क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचे सदस्य बिकाश प्रधान यांचंही नाव घेतलं आहे. त्यांचाही या कथित घोटाळ्यात आणि घोटाळेबाजांशी संबंध असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर गुरूग्राम पोलीस त्यांना नोटीस देण्याच्या तयारीत आहे.

कुणावर आहे संशय?

'द ट्रिब्यून' नं दिलेल्या वृत्तानुसार रावत आणि आशुतोष बोरा यांच्या चॅटमध्ये अनेक बड्या नावांचा समावेश आहे. यामध्ये उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनच्या निवड समितीचे सदस्य अक्रम खान, उपाध्यक्ष माहिम वर्मा आणि उत्तराखंड क्रिकेट संघाचे सीईओ अमन यांचा समावेश आहे. आपण अनेकदा उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड क्रिकेट संघाच्या माध्यमातून खेळाडूंची निवड केल्याचा संकेत रावतने केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. रावतच्या खात्यामध्ये आशुतोष बोराच्या फर्म खात्यामधून 35 लाखांपेक्षा जास्त रक्कम ट्रान्सफर करण्यात आली होती. सिक्किम क्रिकेट असोसिएशनच्या बिकाश प्रधान यांना बोराच्या खात्यामधून 2 लाख ट्रान्सफर करण्यात आले, अशी माहिती आहे. तसंच अरुणाचल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष नबाम विवेक यांचीही या प्रकरणात चौकशी केली जाणार आहे.

उनमुक्त चंदनंतर आणखी एका दिग्गज खेळाडूने देश सोडला, अमेरिकेतून खेळणार क्रिकेट

गुरुग्राम पोलिसांनी 4 सप्टेंबर रोजी तरुण क्रिकेटपटूंची फसवणूक करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला होता. पोलिसांनी या प्रकरणात तीन जणांना अटक केली आहे. हे खेळ नियमन कंपनी स्कियोर कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेडचे (एससीएम) संचालक होते. तर या प्रकरणातील अन्य तीन आरोपी अद्यापही फरार आहेत.

First published:

Tags: Cricket news, Crime news