मुंबई, 06 ऑगस्ट : मुंबईसह ठाणे आणि उपगरांना मुसळधार पावसानं झोडपून काढलं आहे. बुधवारी झालेल्या पावसामुळे अनेक भागांमध्ये तुफान पाणी साचल्यानं नागरिकांचे हाल झाले. तर रात्री पावसाचा जोर वाढला आणि पाणी नागरिकांच्या घरात येऊ लागलं. रात्रभर मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह पावसानं जोर धरला आहे. बुधवारी झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. मंत्रालय, वरळी, भेंडीबाजार या ठिकाणी पाणी साचल्यानं अनेक गाड्या पाण्याखाली गेल्या. तर वरळी कोळीवाडा परिसरात रात्रीच्या सुमारास घरांमध्ये खूप पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे. कोरोनानंतर आलेल्या या नैसर्गिक संकटातून सोडवं अशी नागरिक घरात प्रार्थना करत आहेत.
दुसरीकडे दहीसरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये अक्षरश: धबधबे वाहायला लागले. रात्री उशिरा अशी स्थिती निर्माण झाल्यानं नागरिकांची तारांबळ उडाली. खिडकीतून पुराचा धबधबा वाहू लागला. नागरिकांच्या घरातील वस्तूही पाण्याखाली गेल्या आहेत.
हे वाचा- VIDEO :‘आयुष्यात पहिल्यांदा एवढं पाणी पाहिलं’, पवारांनाही मुंबईच्या पावसाचा फटका बुधवारी झालेल्या मुसळधार पावसाचा फटका मुंबईसह उपनगरांना मोठा बसला. मुंबईसह उपनगरांमध्ये विक्रमी पावसाची नोंद झाली असून जनजीवन पूर्णत: विस्कळीत झालं आहे. ट्रेन बंद पडून अनेक लोक अडकले होते. बेस्टच्या बसेसही रस्त्यावरच उभ्या राहिल्याचं चित्र बुधवारी पाहायला मिळालं. बुधवारी बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात आज यंदाच्या मोसमातील 12 तासातील सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. यामध्ये शहर परिसरात 215.8 मिलीमीटर, पूर्व उपनगरांमध्ये 101.9 मिलीमिटर; तर पश्चिम उपनगरांमध्ये 76.03 मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे.

)







