मुंबई, 26 मार्च: गुरुवारी रात्री लागलेल्या आगीमुळे मुंबईतील भांडूप परिसर पुरता हादरून गेला आहे. याठिकाणाहून मिळालेल्या लेटेस्ट अपडेटनुसार याठिकाणी 10 जणांचा मृत्यू झाला आहे. बीएमसीने 6 जणांच्या मृत्यूबाबत माहिती दिल्यानंतर आणखी 4 जणांचे मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. मृतांचा आकडा आणखी वाढेल का अशी भीती निर्माण झाली आहे. कारण या मॉलमध्ये साधारण 500 ते 600 दुकानं सुरू होती. मुंबई महापालिकेने 6 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्तास दुजोरा दिला होता. अग्निशमन दलाला याठिकाणी मृतदेह सापडले आहेत.
A few more precious lives lost in the Bhandup West Fire at Dreams Mall taking the death toll up to six. Our deepest condolences to the families of deceased #MyBMCUpdates https://t.co/N0CGRSwdk8
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) March 26, 2021
दरम्यान सुरुवातीला याठिकाणी 2 मृतदेह सापडले होते. त्यावेळी हॉस्पिटलकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले होते की, या रुग्णांचा मृत्यू कोव्हिडमुळे झाला आहे. त्यामुळे त्यांचा मृत्यू आगीमुळे झाला की कोरोनामुळे याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. आता बीएमसीने असं स्पष्टीकरण दिलं आहे की सहा जणांचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी अद्याप हे अस्पष्ट आहे की मृतांमध्ये कोरोना रुग्णांचा समावेश आहे का? की मॉलमध्ये उपस्थित असणाऱ्या इतर लोकांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे?
काय आहे हॉस्पिटलचे स्टेटमेंट?
'भांडूपमध्ये ड्रीम्स मॉलच्या पहिल्या मजल्यावर आग लागली आणि वरच्या मजल्यावरील सनराइज रुग्णालयापर्यंत या आगीचा धूर पोहोचला.सर्व फायर अलार्म वाजल्यानंतर धुरातून सर्व रूग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्याठिकाहून 2 मृतदेह (कोव्हिडमुळे मृत्यू झालेल) बाहेर काढण्यात आले. आगीमुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. सर्व रुग्णांना तातडीने जंबो कोविड सेंटरमध्ये हलविण्यात आले (आणि काही इतर खासगी रुग्णालयात) आहे. लोकांचे प्राण वाचविण्यास मदत केल्याबद्दल मुंबईकर अग्निशमन दलाचे आणि मुंबई पोलिसांचे आभारी आहोत.'
भांडूपमधील सनराइज हॉस्पिटलमध्ये ही घटना घडली. गुरुवारी रात्री आग लागली होती, याठिकाणी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. दरम्यान आज पुन्हा एकदा सकाळी 8 च्या सुमारास आग भडकल्याची माहिती समोर आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Fire, Fire station, Hospital Fire, Mumbai