मुंबई, 27 जुलै : कोरोनाव्हायरसची
(Coronavirus) लागण एकदा झाल्यानंतर त्याचा पुन्हा संसर्ग
(Corona reinfection) होण्याचा धोका हा असतोच. अशी काही प्रकरणंही समोर आली आहेत. शिवाय काही अभ्यासातही असं दिसून आलं आहे. पण मुंबईतील एका डॉक्टरला कोरोनाचा तीन वेळा संसर्ग झाला
(Mumbai doctor tested corona positive thrice) आणि धक्कादायक म्हणजे दोनदा झालेला संसर्ग हा कोरोनाची लस घेतल्यानंतर झाला आहे
(Corona positive despite taking corona vaccine).
मुलुंडमधील
(Mulund) 26 वर्षांची डॉ. सृष्टी हलारी
(Dr. Shrushti Halari) यांना वर्षभऱात म्हणजे जून 2020 पासून तीन वेळा कोरोनाच निदान झालं. डॉ. हलारी यांना 17 जून, 2020 रोजी कोरोनाची पहिल्यांदा लागण झाली. त्यानंतर 29 मे आणि 11 जुलैलाही त्यांची आरटी-पीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह आली. तिन्ही वेळेला आपल्यात सौम्य लक्षणं होती, असं त्यांनी सांगितलं.
हलारी यांना पहिल्यांदा कोरोना झाला तेव्हा त्या मुलुंडमधील बीएमसी कोविड सेंटरमध्ये काम करत होत्या. त्यांच्या एका सहकाऱ्यालाही कोरोना झाला होता. त्यांनी कामातून ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आणि पुढील परीक्षेची त्या तयारी करत होत्या. त्यामुळे त्यांचा बहुतेक वेळ घरातच जात असे. त्यावेळी जूनमध्ये त्यांचे आई-वडील, भावासह संपूर्ण कुटंबाला कोरोना झाला.
हे वाचा - देशात तिसऱ्या लाटेचे संकेत? या दोन गोष्टींनी वाढवली चिंता
डॉक्टरला तीनदा कोरोना का झाला, याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही असं डॉक्टरांनी सांगितलं. यामागे कोरोनाचा व्हेरिएंट, रोगप्रतिकारक शक्ती किंवा कोरोना चाचणीचा चुकीचा रिपोर्ट अशी बरीच कारणे असू शकतात. डॉ. हलारी यांच्यावर उपचार करणारे डॉ. मेहुल ठक्कर यांनी
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना सांगितलं, कदाचित आरटी-पीसीआर टेस्टचा रिपोर्ट चुकीचा असावा. किंवा मेमध्ये दुसऱ्यांदा जे इन्फेक्शन झालं होतं, तेच जुलैमध्ये सक्रिय झालं असावं.
हे वाचा - पुण्यात उपचाराधीन रुग्णांची संख्या घटली; गाठला 9 महिन्यांचा निच्चांक
दरम्यान डॉ. हलारी यांच्या स्वॅब सॅम्पल्सचा अभ्यास केला जातो आहे. बीएमसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार लसीकरणानंतरही तिला कोरोना का झाला हे तपासण्यासाठी हिलारी यांचे सॅम्पल घेण्यात आले आहे. बीएमसी एका खासगी रुग्णालय आणि फाऊंडेशन फॉर मेडिकल रिसर्चमार्फत (Foundation for Medical Research - FMR) याचा अभ्यास करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.