मुंबई, 03 ऑक्टोबर: मुंबईच्या समुद्रात एका क्रुझवर ( CRUISE SHIP) सुरू असलेल्या हायप्रोफाईल ड्रग्स पार्टीचा एनसीबीने पर्दाफाश केला. त्यानंतर एकच खळबळ माजली. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) नं पहिल्यांदाच समुद्रात अशाप्रकारची छापेमारी करत ऑपरेशन केलं आहे. NCB नं प्रवासी म्हणून मुंबईहून गोव्याकडे जाणाऱ्या लक्झरी क्रूझ Cordelia मध्ये जाऊन सीक्रेट ऑपरेशन केलं. भर समुद्रात ऑपरेशन केल्यानंतर एनसीबी टीम मुंबईला परतली आहे. NCBची टीम रात्री उशिरा मुंबईतील कार्यालयात परत पोहोचली. NCB चे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्त्वाखाली त्यांच्या टीमनं हे सीक्रेट ऑपरेशन केलं आहे. यावेळी समीर वानखेडे यांनी सांगितलं की, आठ जणांना ताब्यात घेतलं आहे. या कारवाईदरम्यान ड्रग्सही जप्त करण्यात आली आहेत.
NCB Mumbai Zonal Director Sameer Wankhede
पुढे समीर वानखेडे यांनी सांगितलं की, या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.
#UPDATE | We've intercepted some persons. The probe is underway. Drugs have been recovered. We're investigating 8-10 persons: Sameer Wankhede, Zonal Director, NCB, Mumbai
— ANI (@ANI) October 2, 2021
"I can't comment on it", says Wankhede on being asked, "Was any celebrity present at the party?" pic.twitter.com/BxBOODT0wg
दोन तरुण NCB कार्यालयातून गेले बाहेर NCBचे पथक रात्री उशिरा ताब्यात घेतलेल्या लोकांसह मुंबईतील त्याच्या कार्यालयात पोहोचले. NCB टीम मुंबई कार्यालयात पोहोचल्यानंतर थोड्याच वेळात दोन तरुणांना सोडण्यात आलं. सुटकेनंतर दोन तरुण एनसीबी कार्यालयातून बाहेर आले. एनसीबी कार्यालयातून बाहेर आलेल्या तरुणांशी बोलण्याचा प्रयत्नही करण्यात आला. पण त्यांनी काहीही बोलण्यास नकार दिला.
#WATCH | Three women, all residents of Delhi, have been brought to Narcotics Control Bureau (NCB) office in Mumbai for questioning in connection with the raid on a rave party at a cruise off the Mumbai coast yesterday pic.twitter.com/DHfd4HL74n
— ANI (@ANI) October 3, 2021
हा कोड वर्ड वापरुन आयोजित केलेली क्रुझवरील ड्रग्स पार्टी NCB ला तीन दिवसांपूर्वीच याबाबतची माहिती मिळाली होती. कोड वर्ड वापरुन ही पार्टी आयोजित केली होती. RTPCR असा हा कोड असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. हेही वाचा- कोकेन ते हॅशिश… काय काय जप्त केलं NCB नं Cordelia क्रूझवरुन या प्रकरणाबाबत बोलताना NCB च्या समीर वानखेडे यांनी सांगितलं, की अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. 22 पैकी आठ जणांची चौकशी सुरू आहे. अद्याप एकालाही अटक केलेली नाही. आज कोणालाही कोर्टात हजर केलं जाणार नाही. हे प्रकरण किचकट आहे. एका बड्या अभिनेत्याच्या मुलालाही ताब्यात घेण्यात आलं आहे, त्याची चौकशी सुरू आहे. आयपीएस अधिकाऱ्याचीही चौकशी सुरू असून या चौकशीत अद्याप काही समोर आलेलं नाही. एक आयपीएस अधिकारी ही ताब्यात याशिवाय एका आयपीएस अधिकाऱ्यालाही (IPS Officer) ताब्यात घेतलं गेलं आहे. या सर्वांकडे अंमली पदार्थ सापडले. यात ताब्यात घेण्यात आलेला व्यक्ती हा अॅडिशनल सीपी दर्जाचा अधिकारी आहे. पार्टीत सहभागी झालेल्यांनी पँटच्या शिलाईत, महिलांच्या पर्समधील हँडलमध्ये, अंडरवेअरच्या शिलाईत तसंच कॉलरच्या शिलाईत अंमली पदार्थ आणले होते. अंमली पदार्थ तस्करांच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांनीच या पार्टीबद्दल माहिती दिली. हेही वाचा- ‘जोधा अकबर’मधील ही अभिनेत्री कालवश; वयाच्या तिसाव्या वर्षीच घेतला जगाचा निरोप काय घडलं नेमकं? एनसीबीच्या पथकाने मुंबईतील समुद्रात Cordelia या क्रुझरवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत घरातील आणि सेलिब्रिटीची या पार्टीला हजेरी होती. या पार्टीत अंमली पदार्थाचा वापर केला करण्यात आला अशी माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने छापा मारला. या कारवाईत एनसीबीने मोठ्या प्रमाणात कोकेन, ड्रग्स, एमडी ड्रग्स जप्त केले आहे. या कारवाईमध्ये अनेक जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये बॉलिवूडमधील एका मोठ्या अभिनेत्याच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. हेही वाचा- 100 रुपयांसाठी मावशीने केलेला अपमान जिव्हारी; पुण्यातील तरुणाने केला हृदयद्रावक शेवट एनसीबीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. पहिल्यांदाच एखाद्या क्रुझवर NCB च्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या क्रुझवर एक फॅशन शो सुरू होता. त्यामुळे अनेक श्रीमंत व्यक्ती आणि बॉलिवूडमधील सेलिब्रिटी या क्रुझवर हजर होते. NCB ने ही ड्रग्स पार्टी उधळून लावली. जवळपास 1500 लोक या क्रुझवर हजर असल्याची माहिती समोर आली आहे. यात दिल्लीतील मोठे व्यापारी सुद्धा सामील होते. अनेक लोकांकडे ड्रग्स आढळून आले आहे. NCB चे पथक मागील 20 दिवसांपासून या क्रुझवर नजर ठेवून होते.