Home /News /mumbai /

कोकेनपासून हॅशिशपर्यंत... समुद्र किनारी Cordelia क्रूझवर ड्रग्स पार्टीमध्ये काय-काय मिळाले NCBला?

कोकेनपासून हॅशिशपर्यंत... समुद्र किनारी Cordelia क्रूझवर ड्रग्स पार्टीमध्ये काय-काय मिळाले NCBला?

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (Narcotics Control Bureau) आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे.

    मुंबई, 03 ऑक्टोबर: मुंबईच्या समुद्रात हायप्रोफाईल ड्रग्स पार्टी (High profile drugs party) दरम्यान नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (Narcotics Control Bureau) आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे. सुमारे 7 तास चाललेल्या छाप्यादरम्यान, एनसीबीनं (NCB) मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केली आहेत. मुंबईच्या अरबी समुद्रात एका आलिशान क्रुझवर फॅशन शोच्या नावाखाली ही ड्रग्स पार्टी सुरु होती. त्याचा अंमली विरोधी पथक अर्थात NCB ने पर्दाफाश केला आहे. या क्रुझवर जवळपास 1500 लोक होती. यात बॉलिवूडचे अनेक सेलिब्रिटी आणि दिल्लीत व्यापाऱ्यांचा समावेश आहे. NCB ने बॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलाला ताब्यात घेतलं आहे. मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझवर एनसीबीनं छापा टाकला. Cordelia या क्रुझवर समुद्रकिनाऱ्यावर पार्टी सुरु होती, पण याच दरम्यान एनसीबीने छापा टाकला. या दरम्यान मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त करण्यात आली आहेत. या क्रुझवर जवळपास 1500 लोक होती. आरोपींना रविवारी न्यायालयात हजर केलं जाण्याची शक्यता आहे. छापेमारी दरम्यान 4 प्रकारचे ड्रग्स जप्त अधिकाऱ्यानं सांगितल्याप्रमाणे, क्रूझवर अजूनही तपास सुरू आहे. क्रूझवरच्या अनेक खोल्यांचा शोध घेण्यात आला आणि अनेकांचा तपास अद्याप बाकी आहे. या छाप्यात ड्रग्स MDMA, मेफेड्रोन (Mephedrone), कोकेन (Cocaine)आणि हॅशिश (Hashish)अशी चार प्रकारची ड्रग्स जप्त करण्यात आली आहेत. तसेच बॉलिवूड सुपरस्टारच्या मुलासह 8 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. हेही वाचा- 'जोधा अकबर'मधील ही अभिनेत्री कालवश; वयाच्या तिसाव्या वर्षीच घेतला जगाचा निरोप 3 दिवस चालणार होती क्रुझवर ड्रग्स पार्टी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून एनसीबीच्या पथकांनी अनेक ड्रग्स तस्कारांचं कंबरडं मोडलं आहे. त्यामुळे मुंबईत ड्रग्स तस्करांचे धाबे दणाणले आहे. अशाच मुंबईच्या धर्तीवरून निघून मोकळ्या समुद्रात ड्रग्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. पण, एनसीबीने मोठ्या शिताफीने ही पार्टी उधळून लावली आहे. नव्या माहितीप्रमाणे हे क्रुझ आजपासून मुंबईपासून गोव्याला 3 दिवसांसाठी रवाना होणार होते. मुंबई झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांना इतर अधिकाऱ्यांसह प्रवासी म्हणून उभ्या असलेल्या जहाजावर पोहोचल्याची टीप मिळाली. जेव्हा जहाज मुंबईहून निघाले आणि मध्य समुद्रात पोहोचेल, तेव्हा पहिल्या पार्टीला सुरुवात झाली आणि जिथे ड्रग्जचे सेवन केले जात होते. काय घडलं नेमकं? एनसीबीच्या पथकाने मुंबईतील समुद्रात Cordelia या क्रुझरवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. श्रीमंत घरातील आणि सेलिब्रिटीची या पार्टीला हजेरी होती. या पार्टीत अंमली पदार्थाचा वापर केला करण्यात आला अशी माहिती एनसीबीच्या पथकाला मिळाली होती. त्यानंतर एनसीबीच्या पथकाने छापा मारला. या कारवाईत एनसीबीने मोठ्या प्रमाणात कोकेन, ड्रग्स, एमडी ड्रग्स जप्त केले आहे. या कारवाईमध्ये अनेक जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये अनेक सेलिब्रिटींना ताब्यात घेतले आहे. यामध्ये बॉलिवूडमधील एका मोठ्या अभिनेत्याच्या मुलाला ताब्यात घेतले आहे. हेही वाचा- मुख्यमंत्रीपदाची खुर्ची राहणार की जाणार?,काही तासात ठरेल ममता बॅनर्जींचं भवितव्य एनसीबीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. पहिल्यांदाच एखाद्या क्रुझवर NCB च्या पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या क्रुझवर एक फॅशन शो सुरू होता. त्यामुळे अनेक श्रीमंत व्यक्ती आणि बॉलिवूडमधील सेलिब्रिटी या क्रुझवर हजर होते. NCB ने ही ड्रग्स पार्टी उधळून लावली. जवळपास 1500 लोक या क्रुझवर हजर असल्याची माहिती समोर आली आहे. यात दिल्लीतील मोठे व्यापारी सुद्धा सामील होते. अनेक लोकांकडे ड्रग्स आढळून आले आहे. NCB चे पथक मागील 20 दिवसांपासून या क्रुझवर नजर ठेवून होते. आतापर्यंत या कारवाईमध्ये 12 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अजूनही चौकशी सुरू आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: NCB

    पुढील बातम्या