मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

आर्यन खान हाजिर हो...तुरुंगातून सुटल्यानंतर पहिल्यांदा Aryan Khan आज NCB कार्यालयात लावणार हजेरी

आर्यन खान हाजिर हो...तुरुंगातून सुटल्यानंतर पहिल्यांदा Aryan Khan आज NCB कार्यालयात लावणार हजेरी

30 ऑक्टोबरला सुटका झाल्यानंतर पहिल्यांदा आर्यन खानला आज क्रूझ ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या ऑफिसमध्ये हजेरी लावावी लागणार आहे.

30 ऑक्टोबरला सुटका झाल्यानंतर पहिल्यांदा आर्यन खानला आज क्रूझ ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या ऑफिसमध्ये हजेरी लावावी लागणार आहे.

30 ऑक्टोबरला सुटका झाल्यानंतर पहिल्यांदा आर्यन खानला आज क्रूझ ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या ऑफिसमध्ये हजेरी लावावी लागणार आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 05 नोव्हेंबर: मुंबईतील क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणात (Mumbai cruise drugs party case) अटक झालेल्या बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा (Bollywood actor Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खानची (Aryan Khan) 26 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका झाली. 30 ऑक्टोबरला सुटका झाल्यानंतर पहिल्यांदा आर्यन खानला आज क्रूझ ड्रग्ज प्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (Narcotics Control Bureau) ऑफिसमध्ये हजेरी लावावी लागणार आहे. सध्या आर्यन खान जामिनावर बाहेर आहे.

आर्यन खानला मुंबई उच्च न्यायालयाने अटी आणि शर्तींवर सशर्त जामीन मंजूर केला आहे. या जामिनानुसार, आर्यनला शुक्रवारी सकाळी 11 ते 2 या वेळेत, मुंबईतल्या एनसीबीच्या ऑफिसमध्ये हजेरी लावावी लागणार आहे. आर्यन खानची गेल्या महिन्यात 30 ऑक्टोबरला आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली होती.

आर्यनला 1 लाखांच्या जातमुचलक्यावर जामीन

मुंबई उच्च न्यायालयानं आर्यन खानला अटी शर्तीसह जामीन मंजूर केला. तीन दिवस सुरु असलेल्या जोरदार युक्तीवादानंतर आर्यनचे वकील मुकुल रोहतगी यांनी जमेची बाजू लावून धरत आर्यन खानला जामीन मिळवून दिला. आर्यनसह अरबाज आणि मुनमून यांची जामिनीवर सुटका झाली. या जामीन अर्जामध्ये अनेक अटींची आर्यनला पालन करावं लागणार आहे.

हेही वाचा- दोन दिवसात NCB ची दुसरी धडक कारवाई, चार कोटींच्या हेरॉईनसह एक जण अटकेत

एकूण 5 पानांची ॲार्डर आहे. 1 लाख रुपयांचा जातमुचलक्यावर प्रत्येकी जामीन मंजूर करण्यात आला आहे. असा गुन्हा परत करू नये, इतर आरोपींशी बोलू नये, साक्षीदारांवर प्रभाव टाकू नये, देश सोडू नये, मीडियाची, सोशल मीडियावर बोलू नये असे नियम घालण्यात आले आहे. त्याचबरोबर एनसीबी ऑफिसमध्ये प्रत्येक शुक्रवारी 11 ते 2 वेळात हजर राहावे लागणार आहे.

आर्यन खान न्यायालयाच्या 'त्या' अटीचं करतोय का पालन?

आर्यन खानला मुंबईतल्या क्रूझ ड्रग्ज (Cruise Drug Party) पार्टी प्रकरणात 26 दिवस तुरुंगात राहावं लागलं. 30 ऑक्टोबर अखेर आर्यन खान (Aryan Khan) तुरुंगाबाहेर आला. मुंबई उच्च न्यायालयानं (Bombay High Court) त्याला जामीन दिला. मात्र याचबरोबर काही कठोर अटी देखील घातल्या. या अटींचं पालन करणं बंधनकारक असतं. मात्र आर्यन या अटींचं पाळत करत आहे की नाही याबाबत आता माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी आर्यन खान सह त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमून धामेचा या तिघांचा एकाचवेळी जामीन मंजूर झाला. यांचा जामीन अर्ज मंजूर करत असताना न्यायालयानं अनेक अटी नियम घातले. यात तिघांनीही एकमेकांच्या संपर्कात राहायचं नाही, अशी अट न्यायालयानं घातली. यावर अरबाजचे वडील अस्लम मर्चंट यांनी महत्त्वाची माहिती दिली.

हेही वाचा- किरण गोसावीबाबत मुंबई पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे, करणार मोठी कारवाई

अरबाज आणि आर्यन न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच न्यायालयाने दिलेल्या आदेशाचं उल्लंघन होणार नाही याची आम्ही दक्षता घेत आहोत. त्या दोघांना देखील जामीन अर्ज रद्द झालेला चालणार नाही. नाईलाज असला तरी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावेच लागणार असल्याचं अस्लम मर्चंट यांनी सांगितलं.

पुढे ते सांगतात की, अरबाज हा आर्यनचा जवळचा मित्र आहे आणि आर्यन अडचणीत येईल असं कोणतंही काम तो करणार नाही. म्हणूनच दोघांनीही एकमेकांपासून दूर राहण्याचे ठरवलं आहे.

First published:

Tags: Aryan khan, NCB, Shah Rukh Khan