मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /दोन दिवसात दुसरी धडक कारवाई, NCB कडून 4 कोटींचे हेरॉईन जप्त; एकाला अटक

दोन दिवसात दुसरी धडक कारवाई, NCB कडून 4 कोटींचे हेरॉईन जप्त; एकाला अटक

नार्कोटिक्स कंट्रोल ( Narcotics Control Bureau) ब्युरोनं दोन दिवसात पुन्हा एकदा दुसरी धडक कारवाई केली आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ( Narcotics Control Bureau) ब्युरोनं दोन दिवसात पुन्हा एकदा दुसरी धडक कारवाई केली आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ( Narcotics Control Bureau) ब्युरोनं दोन दिवसात पुन्हा एकदा दुसरी धडक कारवाई केली आहे.

मुंबई, 05 नोव्हेंबर: नार्कोटिक्स कंट्रोल ( Narcotics Control Bureau) ब्युरोनं दोन दिवसात पुन्हा एकदा दुसरी धडक कारवाई केली आहे. मुंबई झोनल युनिटनं (Mumbai Zonal Unit) ही छापेमारी करत कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त (seized crores of drugs) केलेत. मुंबई विमानतळ परिसरात ही कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येतेय. तब्बल 4 कोटींचे हेरॉईन (heroin ) मुंबई विमानतळाच्या कार्गो कॉम्प्लेक्समधून (Mumbai airport cargo complex) ताब्यात घेतलेत. या कारवाईत एनसीबीनं एकाला अटक केली आहे.

गुप्त मिळालेल्या माहितीच्या आधारे एनसीबीच्या मुंबई झोनल युनिटनं ही कारवाई केली. एनसीबीला सहार इंटरनॅशनल कुरिअर टर्मिनलवर पार्सलद्वारे अंमली पदार्थ येणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकत संशयित वस्तूंची तपासणी करण्यास सुरुवात केली. या तपासणी दरम्यान एनसीबीला कार्गो कॉम्प्लेक्समधील कॉन्फरन्स हॉलमधील एका पार्सलमध्ये संशयित पावडर आढळून आली. त्यानंतर पावडरची तपासणी केली असता ती पावडर हेरॉईन असल्याचं स्पष्ट झालं. या कारवाईत जवळपास 700 ग्रॅमची ही हेरॉईन आहे. याची किंमत अंदाजित चार कोटी रुपये आहे.

या प्रकरणी एनसीबीकडून एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे पार्सल वडोदरामधील एका व्यक्तीचं असल्याचं समजतंय. या व्यक्तीची चौकशी केल्यानंतर त्याला एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

विलेपार्लेत पकडले कोट्यवधींचे हेरॉईन

मंगळवारी मुंबईत नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं (NCB action ) धडक कारवाई केली. एनसीबीनं ही धडक कारवाई विलेपार्ले (Vile Parle area) परिसरात केली आहे. या कारवाईत कोट्यवधींचे हेरॉईन (heroin)जप्त करण्यात आलेत. एनसीबीनं या कारवाईची माहिती दिली आहे. या कारवाईत कोट्यवधींचे हेरॉईन जप्त केलेत. तसंच या प्रकरणातल्या संशयितांचा एनसीबी पथक शोध घेत आहेत, अशी माहिती एनसीबीनं दिली.

हेही वाचा- किरण गोसावीबाबत मुंबई पोलिसांच्या हाती महत्त्वाचे पुरावे, करणार मोठी कारवाई

नवी मुंबईतही कारवाई

ऑक्टोबर महिन्यात नवी मुंबईतील न्हावा शेवा बंदरातही एनसीबीनं मोठी कारवाई केली होती. या कारवाईत DRE च्या झोनल युनिटने 25 किलो हेरॉईन जप्त केलं होतं. हेरॉईनचा हा साठा एका कंटेनरमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत 125 कोटी रुपये होती. या कारवाईनंतर एनसीबीनं नवी मुंबईतील एका व्यावसायिकाला देखील अटक केली होती.

First published:

Tags: Drugs, NCB