बीड, 02 मे : बीडमध्ये (Beed) काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे (Corona) मृत झालेल्या 22 रुग्णांवर एकत्र अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या घटनेमुळे बीडमधील परिस्थिती किती विदारक आहे, याचा अंदाज कुणालाही येईल. पण, काही कोरोनाबाधित रुग्णांवर यांचा कोणताही परिणाम झाला नाही. कोविड सेंटरमधून (Covid center) बाहेर येऊन हे रुग्ण मास्क न लावता फळं विकत घेत असल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. बीड जिल्ह्यातील वडवणी शहरातील छत्रपती शाहू महाराज कोविड सेंटरमध्ये हा प्रकार घडला आहे. काही कोरोनाबाधित रुग्णांचा रस्त्यावर मुक्तसंचार पाहण्यास मिळाला आहे. स्थानिक तरुणांनी या रुग्णांचा प्रताप कॅमेऱ्यात कैद केला आहे. काही तरुणांनी या रुग्णांना हटकले असता ‘खाण्याचे पदार्थ घेण्यासाठी बाहेर आलो’ अशी उत्तर देऊन थेट कोविड सेंटर गाठले. धक्कादायक म्हणजे, या बाधितांनी तोंडावर साधे मास्क सुद्धा लावले नव्हते.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण थेट खाद्यपदार्थ खरेदीसाठी रस्त्यावर आल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. वारंवार सूचना करूनही कोरोना रुग्ण कोविड सेंटरच्या बाहेर पडत आहे. कोविड सेंटर प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे, कोविड सेंटर उभारले मात्र व्यवस्था नसल्याचा आरोप रुग्ण करत आहे. ऐश्वर्याच्या ‘या’ सवयीवर बच्चन कुटुंबीय चिडतात; श्वेता नंदानं केली पोलखोल दरम्यान, मोकाट फिरणाऱ्यावर कारवाई करण्यासाठी बीडचे पोलीस अधीक्षक आर राजा स्वतः रस्त्यावर उतरले आहेत. बीड जिल्ह्यातील वाढता कोरोनाचा आकडा कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासन कसोशीने प्रयत्न करत असताना दुसरीकडे कोरोनाचे नियम पायदळी तुडवून मोकाट फिरणारे कमी नाहीत. विनाकारण बाहेर फिरणाऱ्याची ऑंटीजण टेस्ट केली जात असून पॉझिटिव्ह आढळता क्षणी कोविडं सेंटरमध्ये रवानगी केली जात आहे तर निगेटिव्ह आढळला तर 500 रुपये दंड आकारण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, असे देखील आवाहन केले.