• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • Corona: एप्रिल महाराष्ट्रासाठी ठरला धडकी भरवणारा; एका महिन्यात 21 टक्के कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

Corona: एप्रिल महाराष्ट्रासाठी ठरला धडकी भरवणारा; एका महिन्यात 21 टक्के कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

कोणत्याही सामाजिक सांस्कृतिक / राजकीय / धार्मिक मेळाव्यास अनुमती दिली जाणार नाही. सभामंडप किंवा नाटक थिएटर देखील मेळावा आयोजित करण्यासाठी वापरु नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

कोणत्याही सामाजिक सांस्कृतिक / राजकीय / धार्मिक मेळाव्यास अनुमती दिली जाणार नाही. सभामंडप किंवा नाटक थिएटर देखील मेळावा आयोजित करण्यासाठी वापरु नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

महाराष्ट्रातल्या आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांपैकी 38.88 टक्के कोरोनाबाधितांची (Corona Patients) नोंद एप्रिल 2021 या एकाच महिन्यात (Total Corona Cases Found at Maharashtra in April) झाली आहे.

  • Share this:
मुंबई 03 मे : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा (Corona Second Wave) सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. मुंबई आणि महाराष्ट्रासाठी नुकताच सरलेला एप्रिल महिना कोरोना महामारी (Corona Pandemic) सुरू झाल्यापासूनचा सर्वांत भयावह ठरला आहे. महाराष्ट्रातल्या आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांपैकी 38.88 टक्के कोरोनाबाधितांची (Corona Patients) नोंद एप्रिल 2021 या एकाच महिन्यात (Total Corona Cases Found at Maharashtra in April) झाली आहे. तसंच कोरोनामुळे मरण पावलेल्या राज्यातल्या नागरिकांपैकी 20.58 टक्के जणांचे मृत्यू एकट्या एप्रिल महिन्यात झाले आहेत. एकट्या मुंबईचा विचार करताही एप्रिल महिना सर्वांत भीषण ठरला आहे. मुंबईतल्या आतापर्यंतच्या एकूण कोरोनाबाधितांपैकी 36 टक्के कोरोनाबाधितांची नोंद एप्रिल महिन्यात झाली, तर एकूण मृत्यूंपैकी 10.93 टक्के मृत्यू एकट्या एप्रिलमध्ये नोंदवले गेले. हिंदुस्तान टाइम्सने या परिस्थितीचं विश्लेषण करणारं वृत्त दिलं आहे. महाराष्ट्रात (Maharashtra) एप्रिल 2021 या महिन्यात 17 लाख 89 हजार 492 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तसंच, एप्रिल महिन्यात कोरोनामुळे महाराष्ट्रात 14 हजार 164 नागरिकांना प्राण गमवावे लागले. मुंबईत (Mumbai) एप्रिल महिन्यात दोन लाख 33 हजार 698 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आणि 1435 जणांचा मृत्यू झाला. सप्टेंबर 2020 मध्ये कोरोना संसर्गाच्या पहिल्या लाटेने महाराष्ट्रात सर्वोच्च पातळी गाठली होती. त्या वेळपेक्षाही एप्रिल महिन्यातली आकडेवारी भीषण आहे. 11 सप्टेंबर 2020 रोजी महाराष्ट्राने कोरोनाच्या पहिल्या लाटेतला सर्वोच्च बिंदू (Highest Peak) गाठला. त्यादिवशी 24 हजार 886 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. सप्टेंबर महिन्यात पाच लाख 91 हजार 905 नवे रुग्ण आणि 12 हजार 79 मृत्यूंची नोंद महाराष्ट्रात झाली होती. कोरोनाच्या तोपर्यंतच्या आकडेवारीपैकी 42 टक्के नवे रुग्ण एकट्या सप्टेंबरमध्ये सापडले होते. तसंच, तोपर्यंतच्या मृतांपैकी 32.94 टक्के जणांचे मृत्यू सप्टेंबरमध्ये झाले होते. सप्टेंबर महिन्यात महाराष्ट्रात एकूण 26 लाख 46 हजार 276 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी 22.36 टक्के जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले होते. सप्टेंबर 2020 मध्ये मुंबईत 59 हजार 463 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली होती. हा आकडा मुंबईतल्या तोपर्यंतच्या एकूण बाधितांपैकी 29 टक्के एवढा होता. त्याच महिन्यात मुंबईत 1271 जणांचा मृत्यू झाला आणि हे प्रमाण तोपर्यंतच्या मृतांपैकी 14.23 टक्के एवढं होतं. एप्रिल महिन्यात नव्या बाधितांची नोंद मोठ्या प्रमाणावर होण्यामागे चाचण्यांची वाढलेली संख्या (Number of tests) हेही कारण आहे. एप्रिल 2021 मध्ये 73 लाख 14 हजार 139 चाचण्या झाल्या. त्यापैकी 24.46 टक्के जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. महाराष्ट्राच्या कोविड टास्क फोर्सचे (Covid Task Force) सदस्य डॉ. शशांक जोशी (Dr Shashank Joshi) यांनी महाराष्ट्रात दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर येईल, असा अंदाज गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच वर्तवण्यात आला होता असं सांगितलं. 'विषाणूजन्य आजाराची दुसरी लाट अधिक संसर्गजन्य आणि अधिक घातक असते. त्यानुसार या लाटेचा अंदाज ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्येच वर्तवण्यात आला होता. त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट अशी, की एकूण बाधितांचा आकडा मोठा असला, तरी बाधित होण्याचं प्रमाण अर्थात पॉझिटिव्हिटी रेट नियंत्रणात आहे,' असं डॉ. शशांक जोशी म्हणाले. ऑक्सिजनअभावी मृत्यूतांडव सुरूच; एकाच रुग्णालयातील 24 जणांचा तडफडून अंत दरम्यान, ऑक्सिजन उपलब्धतेच्या (Oxygen Availability) बाबतीत मुंबई, मुंबई महानगर प्राधिकरण, पुणे आणि पिंपरी-चिंचवड या शहरांनी स्वयंपूर्ण बनावं, अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत. लहान मुलांवर उपचारांच्या दृष्टीने आरोग्याच्या पायाभूत सुविधा सज्ज ठेवाव्यात अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी या महापालिकांच्या बैठकीत दिल्या. पहिल्या लाटेत ज्येष्ठांना अधिक त्रास झाला. दुसऱ्या लाटेत 30 ते 50 या वयोगटातल्या व्यक्तींचं प्रमाण अधिक दिसतं आहे. तसंच मुलांमध्येही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे तिसरी लाट येईल, असं गृहीत धरून नियोजन करावं, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. गृहविलगीकरणातल्या आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांकरिता स्वतंत्र कंट्रोल रूम तयार करण्याच्या सूचनाही ठाकरे यांनी दिल्या आहेत. शनिवारी (एक मे) राज्यात 63 हजार 282 नव्या बाधितांची नोंद झाली असून 802 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात सध्या अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या 6 लाख 63 हजार 758 एवढी असून, आतापर्यंत राज्यातल्या 69 हजार 615 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यातल्या आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या 46 लाख 65 हजार 754 एवढी झाली आहे.
Published by:Kiran Pharate
First published: