BMC चा 'तो' निर्णय चुकला? आता 'या' गोष्टीने वाढवलं मुंबईकरांचं टेन्शन

BMC चा 'तो' निर्णय चुकला? आता 'या' गोष्टीने वाढवलं मुंबईकरांचं टेन्शन

Coronavirus In Mumbai : मुंबईतील पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला हा दिलासा मिळाला असला तरी मुंबईकरांची चिंता मात्र संपली नाही.

  • Share this:

मुंबई, 03 मे : मुंबईकरांसाठी सध्या कोरोनाची परिस्थिती (Mumbai coronavirus) खूपच दिलासादायक आहे. शहरात सर्वात जास्त चाचण्या होऊनही पॉझिटिव्हीटी रेट (Mumbai Corona Positivity Rate) मात्र कमी आहे. मुंबईतील कोरोना नियंत्रणात असल्याचे हे संकेत आहेत. पण आता वेगळ्याच गोष्टीने मुंबईकरांचं टेन्शन वाढवलं आहे. ते म्हणजे पॉझिटिव्ही रेटसह आता कोरोना चाचण्याही (Mumbai Corona Test) कमी झाल्या आहेत, हे मुंबई महापालिकेनंही (BMC) मान्य केलं आहे.

मुंबईतील कोरोनाची प्रकरणं कमी येण्यास चाचण्या कमी होणं हे कारण आहे, असा आरोप विरोधकांनी केला होता. पण बीएमसीने विरोधकांचा हा आरोप फेटाळून लावला होता. आपण चाचण्या वाढवल्या, त्यानंतर त्या थोड्याफार प्रमाणात कमी केल्या पण का याचं कारणही दिलं. तसंच चाचण्यांपेक्षा पॉझिटिव्हीटी रेट महत्त्वाचा असून मुंबईतील हा पॉझिटिव्हीटी रेट कमी असल्याचं बीएमसीने सांगितलं होतं. आता मात्र बीएमसीनेही चाचण्या कमी होत असल्याचं मान्य केलं आहे आणि चाचण्या पुन्हा वाढवण्यावर भर दिला आहे.

गेल्या काही दिवसांपासून चाचण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. बीएमसीचे आयुक्त इक्बाल चहल (BMC Commissioner Iqbal Chahal)  यांनी सांगितलं, "मुंबईतून कोरोनाचा खात्मा करण्यासाठी जास्तीत जास्त कोरोना टेस्ट वाढणं हे उद्दिष्ट मुंबई महापालिकेचं आधीपासूनच आहे. मार्च 2020 पासून 10 फेब्रुवारी 2021 पर्यंत आपल्या सर्वाधिक दैनंदिन चाचण्या 24500 होत्या. त्यानंतर 21 एप्रिलपासून चाचण्यांचं प्रमाण दुप्पट झालं. दररोज  56000 चाचण्या होऊ लागल्या. एप्रिल 2021 मध्ये महिन्याला दिवसाला सरासरी  44000 चाचण्या झाल्या"

हे वाचा - महाराष्ट्रासाठी एप्रिल धडकी भरवणारा; महिन्यात 21 टक्के कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

"पण गेल्या काही दिवसांपासून चाचण्या कमी होत असल्याचं दिसून आलं आहे. शनिवारी 50,000 पेक्षा जास्त आणि रविवारी 28,000 चाचण्या झाल्या. वीकेंडला हा आकडा आणखी कमी होण्याची शक्यता आहे. आमच्या चाचणी धोरणामुळे पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला आहे. नागरिकांकडून होम कलेक्शन स्वॅबची मागणी गेल्या काही दिवसांपासून घटली आहे. आपल्याला दिवसाला कमीत कमी 40,000 पर्यंत चाचण्या वाढवायला हव्यात. त्यामुळे मी नागरिकांनी आपल्या चाचण्या करून घ्याव्यात", असं आवाहन इक्बाल चहल यांनी केलं आहे.

याआधी न्यूज 18 लोकमतशी बोलताना इक्बाल चहल यांनी सांगितलं होतं,  "मार्च 2020 मध्ये कोरोनाची पहिली लाट आल्यापासून ते 10 फेब्रुवारी, 2021 पर्यंत मुंबईत दररोज 24,500 च्या वर कोरोना टेस्टिंग गेली नाही. पण कोरोनाची दुसरी लाट आली. त्यानंतर आपण ही टेस्टिंग 24 हजारांवरून 56 हजारांवर नेली. मुंबईत 55 टेस्टिंग लॅब आहेत. त्यांची क्षमता दिवसाला 50 हजार चाचण्यांची आहे. यापेक्षा जास्त टेस्टिंग होत असल्याने त्यांनाही अडचण येत होती. त्यामुळे लोकांना दोन-तीन दिवस चाचणीचे रिपोर्ट मिळत नव्हते. गंभीर लोकांची तब्येत बिघडत होती आणि परिणामी मृत्यूही होत होते"

हे वाचा - ऑक्सिजनअभावी मृत्यूतांडव सुरूच; एकाच रुग्णालयातील 24 जणांचा तडफडून अंत

चहल पुढे म्हणाले, "त्यानंतर मग आम्ही मुंबईतील सर्व लॅबची बैठक घेतली आणि त्यांना कार्पोरेट टेस्टिंग बंद करायला सांगितले. कारण होम कलेक्शनच्या स्वॅब टेस्टिंगसाठी फोन येत असताना स्लॉट नसल्याचं सांगत लॅब दोन-तीन दिवसांनंतरचा वेळ देत असत. आम्ही त्यांना असं न करण्यास सांगितलं. कार्पोरेट टेस्टिंग बंद करून होम कलेक्शनच्या टेस्टिंगवर भर द्यायला सांगितला आणि त्याचे रिपोर्ट 24 तासांत देण्यास सांगितले.  लॅबनी बीएमसीने दिलेल्या आदेशाप्रमाणे आठ ते दहा हजार कार्पोरेट टेस्टिंग कमी केली"

पण आता बीएमसीने टेस्टिंग कमी करण्याच्या या निर्णयानंतर टेस्टिंग खूपच कमी प्रमाणात होऊ लागल्या आहात. हा आकडा 40 हजारच्याही खाली गेला आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे.

Published by: Priya Lad
First published: May 3, 2021, 3:49 PM IST

ताज्या बातम्या