ऑक्सिजनअभावी मृत्यूतांडव सुरूच; एकाच रुग्णालयातील 24 जणांचा तडफडून अंत

ऑक्सिजनअभावी मृत्यूतांडव सुरूच; एकाच रुग्णालयातील 24 जणांचा तडफडून अंत

ऑक्सिजनअभावी कोविड रुग्णालयातील 24 रुग्णांचा मृत्यू (24 Patients Died Due to Lack of Oxygen Supply) झाला आहे. ही घटना रविवारी रात्री घडली आहे.

  • Share this:

बंगळुरू 03 मे: देशात कोरोना रुग्णसंख्येत (Corona Cases in India) झपाट्यानं वाढ होत आहे. अशात आरोग्य सुविधांचा मोठा अभाव जाणवत आहे. अनेक रुग्णांचा उपचार न मिळाल्यानं मृत्यू होत आहे. तर, रुग्णालयात ऑक्सिजन सपोर्टवर (Oxygen Support) असणाऱ्या रुग्णांचाही ऑक्सिजनअभावी मृत्यू होत असल्याच्या अनेक घटना समोर येत आहेत. अशात आता कर्नाटकच्या चामराजनगरमधूनही एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. याठिकाणी ऑक्सिजनअभावी कोविड रुग्णालयातील 24 रुग्णांचा मृत्यू (24 Patients Died Due to Lack of Oxygen Supply) झाला आहे. ही घटना रविवारी रात्री घडली आहे.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी देशात संपूर्ण लॉकडाऊन गरजेचं; सरकार आज घेणार निर्णय!

कर्नाटक राज्यात अनेक ठिकाणी ऑक्‍सिजनचा तुटवडा आहे. सरकारी रुग्णालयातही ऑक्‍सिजन उपलब्ध नसल्यानं रुग्णांचे जीव धोक्यात आहेत. मात्र, ही घटना ऑक्सिजन टंचाईमुळे झाली नसल्याचा दावा जिल्हाधिकाऱ्यांनी केला आहे. मात्र, मृत्यू झालेले सर्व रुग्ण हे ऑक्सिजन सपोर्टवर होते. या घटनेनंतर रुग्णांच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला आहे. घटनेनंतर स्थानिक आमदारांनी रुग्णांच्या नातेवाईकांची भेट घेतली आहे. तर, मुख्यमंत्र्यांनीही या घटनेबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत बातचीत केली आहे.

देशात कोरोना रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ - 

देशात मागील चोवीस तासांत साडेतीन लाखाहून अधिक कोरोना (Corona Cases in India) रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा जवळपास पन्नास देशांमध्ये एका दिवसात मिळालेल्या रुग्णसंख्येपेक्षाही अधिक आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Second Wave of Corona) प्रसार अत्यंत वेगानं होत असल्यानं तो रोखण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊनची (Lockdown in India) मागणी कोविड टास्क फोर्सच्या (Covid Task Force) सदस्यांनी केली आहे. यावर आज केंद्र सरकार निर्णय घेण्याची शक्यता आहे.

Published by: Kiran Pharate
First published: May 3, 2021, 11:20 AM IST

ताज्या बातम्या