Home /News /pune /

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील भीषण अपघातात तीन मजुरांचा मृत्यू, बसच्या धडकेनंतर 15 जण जखमी

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील भीषण अपघातात तीन मजुरांचा मृत्यू, बसच्या धडकेनंतर 15 जण जखमी

accident

accident

पुन्हा एकदा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai-Pune Expressway) मार्गावर बसचा भीषण अपघात (Terrible Accident) झाला आहे.

    पुणे, 12 डिसेंबर: पुन्हा एकदा मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे (Mumbai-Pune Expressway) मार्गावर बसचा भीषण अपघात (Terrible Accident) झाला आहे. या अपघातात तीन जणांचा (Three People killed) मृत्यू झाला आहे. तर 15 जण जखमी झाले आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुंबईच्या दिशेनं येणाऱ्या मार्गावर खासगी बसनं सिमेंट मिलरला धडक दिल्यानं हा अपघात झाला. या अपघातात मृत्यू झालेले तिघंही बोरघाटात सुरु असलेल्या कामावरील मजूर आहेत. खासगी बस चालक गंभीर जखमी झाला आहे. तर 10 ते 15 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी नजीकच्या उपचार केंद्रात दाखल करण्यात आले आहे. हेही वाचा- Shiv Sena vs BJP: शिवसेनेची मुंबईत बॅनरबाजी, उडवली आशिष शेलारांची खिल्ली मध्यरात्रीच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे मार्गावर हा अपघात झाला. सध्या बोरघाटात रस्त्याचं काम सुरु आहे. या अपघातात या रस्त्याच काम करणाऱ्या तीन मजुरांना आपला जीव गमावावा लागला आहे. या अपघाताची माहिती मिळताच मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आलं. या अपघातामुळे मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. दरम्यान या अपघाताच्या एक दिवस आधी सुद्धा बोरघाटात अपघात झाला होता. पुण्याहून मुंबईच्या दिशेनं जात असलेल्या एका पिकअप वाहनाचा हा अपघात झाला. या अपघातात पिकअप वाहनानं क्रॅश बॅरियरला धडक दिली. धडक दिल्यानंतर पिकअप वाहन उलटलं. यात एक जण ठार तर एक जण जखमी झालं.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Mumbai, Mumbai pune expressway, Pune

    पुढील बातम्या