मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /Mumbai Corona Vaccination: मुंबईनं बनवला नवा रेकॉर्ड, लसीकरणासंदर्भात समोर आली चांगली बातमी

Mumbai Corona Vaccination: मुंबईनं बनवला नवा रेकॉर्ड, लसीकरणासंदर्भात समोर आली चांगली बातमी

Mumbai Corona Vaccination: लसीकरणाच्या बाबतीत मुंबईने (Mumbai Vaccination Record) पुन्हा एकदा विक्रम केला आहे.

Mumbai Corona Vaccination: लसीकरणाच्या बाबतीत मुंबईने (Mumbai Vaccination Record) पुन्हा एकदा विक्रम केला आहे.

Mumbai Corona Vaccination: लसीकरणाच्या बाबतीत मुंबईने (Mumbai Vaccination Record) पुन्हा एकदा विक्रम केला आहे.

मुंबई, 06 जानेवारी: लसीकरणाच्या बाबतीत मुंबईने (Mumbai Vaccination Record) पुन्हा एकदा विक्रम केला आहे. मुंबईनं कोरोना लसीच्या (Corona vaccine) पहिल्या डोसचा 1 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. हे काम मुंबईतील सर्व सरकारी, महापालिका आणि खासगी लसीकरण केंद्रांनी संयुक्तपणे केलं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोसची एकूण आकडेवारी एकत्र केली, तर मुंबईत सुमारे 1 कोटी 81 लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत. अशाप्रकारे मुंबईही 2 कोटी लसीकरणाचा विक्रम करण्याच्या दिशेनं वेगाने वाटचाल करत आहे.

जर आपण लसीच्या पहिल्या डोसच्या वाढत्या क्रमाबद्दल बोललो, तर 31 मे 2021 रोजी मुंबईने 25 लाख लसीचे डोस देण्याचा विक्रम केला होता. 19 जुलैपर्यंत हा आकडा 50 लाखांवर पोहोचला. 15 सप्टेंबरला लसीचा पहिला डोस 75 लाखांपर्यंत देण्यात आले होते आणि आता 5 जानेवारीला 1 कोटींचा विक्रम झाला आहे.

16 जानेवारी 2021 पासून लसीकरण सुरू

16 जानेवारी 2021 पासून देशभरात लसीकरण सुरू झालं. सर्वप्रथम आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरू झालं. यानंतर 5 फेब्रुवारीपासून फ्रंट लाइन वर्कर्ससाठी लसीकरण सुरू करण्यात आले. 60 वर्षांवरील आणि 45 ते 59 वर्षे वयोगटातील इतर कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींसाठी 1 मार्चपासून लसीकरण सुरू झाले. 1 एप्रिलपासून 45 वर्षांवरील लोकांसाठी लसीकरण सुरू झालं. त्याचप्रमाणे 1 मे पासून 18 ते 44 वयोगटातील लोकांसाठी लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली.

15 ते 18 वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण सुरु

मुंबईत 18 वर्षांवरील एकूण 92 लाख 36 हजार 500 लोकांना लसीकरण करायचे आहे. बुधवारी दुपारपर्यंत 99 लाख 80 हजार 629 लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. निर्धारित लक्ष्याच्या तुलनेत हा आकडा 108 टक्के आहे. दुसऱ्या डोसबाबत सांगायचे तर, उद्दिष्टातून 88 टक्के लसीकरण झाले आहे. म्हणजेच 81 लाख 37 हजार 850 जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे.

हेही वाचा-  एकाच शहरात दोन पत्नींसोबत होता राहत तरुण, अशी झाली पोलखोल

आता 3 जानेवारीपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील लहान मुलांसाठी लसीकरण सुरू झालं आहे. यासाठी 9 लाख 22 हजार लहान मुलांचं लसीकरण करायचं आहे. 3 जानेवारी रोजी यापैकी 15 हजार 110 लहान मुलांना लसीचा पहिला डोस देण्यात आला. कोरोना आणि ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेनं लसीकरणाची मोहीम अधिक तीव्र करण्याचा विचार केला आहे.

मुंबईत कोरोना आकडा थेट 15 हजार पार

मुंबईत बुधवारी गेल्या 24 तासात तब्बल 15 हजार 166 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. कोरोनाबाधितांचा हा वाढता आकडा प्रचंड चिंता वाढवणारा आहे. कोरोना रुग्णांचा पॉझिटिव्हीटी दर हा थेट 25 टक्क्यांवर पोहोचला आहे. कोरोना चाचणीत प्रत्येकी तीन रुग्णांनंतर चौथ्या रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह येतोय. त्यामुळे प्रशासनाची देखील चिंता वाढली आहे. प्रशासन या संकटाला सामोरं जाण्यासाठी सज्ज आहे. पण ही रुग्णवाढ लवकरात लवकर थांबवणं आणि कमी करणं हे प्रशासनापुढे आताच्या घडीतील सर्वात मोठं आव्हान आहे. याशिवाय कोरोनाचा रिकव्हरी रेट हा दोन टक्क्यांनी खाली घसरला आहे.

First published:
top videos

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus