Home /News /mumbai /

Mumbai Corona : मुंबईकरांना सर्वात मोठा दिलासा, नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट

Mumbai Corona : मुंबईकरांना सर्वात मोठा दिलासा, नव्या बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या दुप्पट

मुंबईकरांना सर्वात मोठा दिलासा देणारी बातमी आज समोर आली आहे. मुंबईत आज दिवसभरात तब्बल 11 हजार 317 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनावर 22 हजार 73 रुग्णांनी मात केली आहे.

    मुंबई, 14 जानेवारी : मुंबईत गेल्या दोन आठवड्यांपासून  कोरोनाचा प्रचंड उद्रेक बघायला मिळत होता. पण मुंबईकरांना सर्वात मोठा दिलासा देणारी बातमी आज समोर आली आहे. मुंबईत आज दिवसभरात तब्बल 11 हजार 317 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर कोरोनावर 22 हजार 73 रुग्णांनी मात केली आहे. मुंबईकरांसाठी गेल्या काही दिवसांमधील ही सर्वात मोठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईत सध्या 84 हजार 352 रुग्ण सक्रिय आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून रुग्ण बरे होण्याची टक्केवारी थोडी खाली घसरली होती. पण आज ही टक्केवारी 89 टक्क्यांवर पोहोचली आहे. मुंबईतील कोरोनाबाधित रुग्ण दुप्पटीचा दर हा 39 दिवसांवर आला आहे. तर कोरोना संसर्ग वाढीचा दर हा 1.74 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईतील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीवर नजर टाकली तर, 7 जानेवारीपासून मुंबईत कोरोना बाधितांच्या आकडेवारीत घसरण होत आहे. शुक्रवारी (7 जानेवारी) मुंबईत 20 हजार 971 बाधितांची नोंद झाली होती. शनिवारी (8 जानेवारी) 20 हजार 318 तर रविवारी (9 जानेवारी) 19 हजार 474 बाधितांची नोंद झाली होती. त्यानंतर सोमवारी (10 जानेवारी) मुंबईत 13 हजार 648 बाधितांची नोंद झाली होती. हेही वाचा : Coronavirus च्या तिसऱ्या लाटेत मुलांना का होतोय संसर्ग? आरोग्य तज्ज्ञांनी दिलं उ मुंबईत मंगळवारी (11 जानेवारी) 11 हजार 647 रुग्ण आढळले होते. गेल्या काही दिवसातलीही ही सर्वात कमी संख्या होती. मुंबईमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली होती. रुग्णांची संख्याही 25 हजारांच्या पुढे गेली होती. पण, चार दिवसांपासून रुग्णांची संख्या ही कमी-अधिक होताना दिसत आहे. मुंबईत गेल्या 16 दिवसांत 19 रुग्णांचा मृत्यू दरम्यान, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल (BMC commissioner Iqbal Singh Chahal) यांनी मुंबईतील कोरोना परिस्थितीविषयी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी लसीकरणावर जोर दिला जात असल्याचं सांगितलं आहे. "बीएमसीने आतापर्यंत एक कोटीहून अधिक लोकांचं लसीकरण केलं आहे. त्यापैकी 90 लाख लोकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तिसऱ्या लाटेत रुग्णालय आणि ऑक्सिजनचा वापर वाढेपर्यंत निर्बंध लादले जाणार नाहीत. कोरोनामुळे झालेल्या मृत्यूबाबत चहल म्हणाले की, गेल्या 16 दिवसांत 19 मृत्यू झाले आहेत, परिस्थिती अजूनही नियंत्रणात आहे. मुंबईत सध्या एक लाख अॅक्टिव्ह केसेस आहेत पण रोज फक्त 10 टन ऑक्सिजन वापरला जात आहे", अशी माहिती मुंबई पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (BMC commissioner Iqbal Singh Chahal) यांनी दिली आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या