जाहिरात
मराठी बातम्या / कोरोना / Coronavirus च्या तिसऱ्या लाटेत मुलांना का होतोय संसर्ग? आरोग्य तज्ज्ञांनी दिलं उत्तर

Coronavirus च्या तिसऱ्या लाटेत मुलांना का होतोय संसर्ग? आरोग्य तज्ज्ञांनी दिलं उत्तर

Coronavirus च्या तिसऱ्या लाटेत मुलांना का होतोय संसर्ग? आरोग्य तज्ज्ञांनी दिलं उत्तर

Corona New Omicron, Covid-19 Third Wave: आरोग्य तज्ञांचा असा अंदाज आहे की ओमिक्रॉन प्रकार डेल्टा पेक्षा जास्त संसर्गजन्य आहे. एका अंदाजानुसार, हा मूळ विषाणूपेक्षा सातपट जास्त संसर्गजन्य आहे, तर काही तज्ञांच्या मते हा संसर्ग 10 पट वेगाने पसरतो. त्यानुसार, तो गोवरच्या जवळ येतो जो एक अत्यंत संसर्गजन्य रोग आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 14 जानेवारी : कोरोनाच्या नवीन प्रकार ओमिक्रॉनमुळे (Corona New Omicron) संसर्ग पुन्हा झपाट्याने वाढत आहे. ओमिक्रॉन प्रकरणांमुळे देशात (Omicron Cases in India) कोविडची तिसरी लाटही (Covid19 Third Wave) आली आहे. ओमिक्रॉन संसर्गाचा (Omicron Infection) वेग यावरूनच समजू शकतो की दहा दिवसांत संसर्गाची प्रकरणे तीन लाखांच्या जवळ पोहोचली आहेत. कोरोनाच्या पहिल्या आणि दुसर्‍या लाटेत प्रौढ आणि वृद्ध लोकांना जास्त संसर्ग होत होता. आता तिसर्‍या लाटेत लहान मुलांना जास्त लागण होत आहे. मुलांना झपाट्याने संसर्ग का होत आहे, यावर एम्सने आयोजित केलेल्या चर्चासत्रात आरोग्य तज्ज्ञांनी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. दिल्लीतील AIIMS मधील बालरोग विभागाचे प्रमुख आणि प्राध्यापक असलेले डॉ. राकेश लोढा, म्हणाले की तिसऱ्या लाटेतमध्ये लहान मुलं अधिक संक्रमित होण्याची अनेक कारणे असू शकतात. मात्र, यातील सर्वात मोठे आणि मुख्य कारण म्हणजे ओमिक्रॉन अधिक संसर्गजन्य आहे. याशिवाय कोविडच्या नियमांमध्ये अनेक कारणांचा समावेश आहे. यात मोठ्या प्रमाणात एकत्र येणे, मास्कचे नियम न पाळणे, सोशल डिस्टन्स न ठेवणे, स्वच्छता न पाळणे अशा गोष्टींचा समावेश आहे. डॉ. लोढा म्हणाले की, ओमिक्रॉनमुळे संसर्गाच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. मात्र, आतापर्यंत संसर्ग झालेल्या मुलांच्या संख्येत कोणतीही नाटकीय वाढ किंवा धक्कादायक प्रकरणे नोंदवली गेली नाहीत. तज्ञांच्या मते, मुलांना कोविडपासून काही प्रमाणात संरक्षित केले गेले होते. कारण मुले विषाणूला चांगला प्रतिसाद देत आहेत. Omicron की Delta तुम्हाला कोणत्या प्रकाराची लागण झाली? ही आहे ओळखण्याची पद्धत दरम्यान, एम्सचे नवी दिल्लीचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी सांगितले की, ओमिक्रॉन संसर्ग आणि कोरोनाची तिसरी लाट यादरम्यान मुलांमधील आजाराची गंभीर दखल घेतली जात आहे. ते म्हणाले की, अमेरिकेतील काही रुग्णालयांमध्ये मुलांना लागण होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोविडच्या तिसर्‍या लहरीमध्ये एखाद्या मुलाला संसर्ग झाल्यास ताप, घसा खवखवणे, नासिका आणि खोकला ही लक्षणे दिसू शकतात. अशी मुले घरच्या घरी उपचार करू शकतात. मुलांना होम आयसोलेशनमध्ये ठेवावे लागेल. वयानुसार पॅरासिटामॉलच्या गोळ्या दर 4-6 तासांनी द्याव्या लागतील. मोठ्या मुलांना कोमट खारट पाण्याने गारगल करा, भरपूर पाणी प्या आणि पौष्टिक आहार घ्या.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: corona , omicron
  • First Published :
जाहिरात
जाहिरात