जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / मुंबईकरांना दिलासा, कोरोनाची नवी आकडेवारी समोर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले!

मुंबईकरांना दिलासा, कोरोनाची नवी आकडेवारी समोर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले!

मुंबईकरांना दिलासा, कोरोनाची नवी आकडेवारी समोर, रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले!

मागील तीन दिवसांत मुंबईत 25 हजाराहून अधिक रूग्णसंख्या आढळून आली होती. ती आता 13 हजारांवर घसरली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 10 जानेवारी : मुंबईमध्ये कोरोना (Mumbai Corona) आणि ओमायक्रॉनचा (Omicron) उद्रेक झाला आहे. गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. पण आज मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. मुंबईत आज कोरोनाचे 13648 नवे रूग्ण आढळून आले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून कोरोनाची रुग्ण संख्या कमी झाली आहे. मुंबईमध्ये कोरोना आणि ओमायक्रॉनची रुग्ण संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्यामुळे निर्बंध लागले आहे. तीन दिवसांमध्ये कोरोनाची रुग्ण संख्या 20 हजारांच्या पुढे पोहोचली होती. पण आज रुग्ण संख्या कमी होत आहे. मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांमध्ये 13648 नवे कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले आहेत. 13648 रुग्णांपैकी फक्त 798 रूग्णांना रग्णालयात दाखल करावे लागले आहे. तर गेल्या २४ तासात कोरोनामुळे मुंबईत 5 जणांचा मृत्यू झाला आहे.  तर २४ तासात २७२१४ रुग्ण बरे झाले आहे. बरे झालेल्या  रुग्णांचा दर हा ८७ टक्के आहे. ( Video : BJP मंत्र्याने दाखवलं घोरून, बिबट्याचा किस्सा ऐकताना पोट धरून हसाल! ) मागील तीन दिवसांत मुंबईत 25 हजाराहून अधिक रूग्णसंख्या आढळून आली होती. ती आता 13 हजारांवर घसरली आहे. रविवारी सुद्धा मुंबईमध्ये दिवसभरात 68 हजार 249 कोरोना टेस्ट करण्यात आल्या. यापैकी जवळपास साडे 19 हजार बाधित आढळले होते. कोरोनाबाधितांचा हा वाढता दर 1.66 टक्के इतका होता. तर डब्लिंग रेट हा 41 दिवसांचा आहे. मुंबई शहरातील सध्या रिकव्हरी रेट हा 85 टक्के इतका आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे. ‘कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना टेस्ट करण्याची गरज नाही’ दरम्यान, कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना (Corona patient) कोरोना संसर्गाचा आणि तो इतरांमध्ये वेगाने पसरण्याचा धोका असतो. त्यामुळे कोरोना रुग्ण सापडला की त्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध घेतला जातो (People contacted with corona patient) आणि त्यांचीही कोरोना टेस्ट केली जाते (Corona test). पण आता याबाबत मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. ( IND vs SA : ताकदच झाली टीम इंडियाची कमजोरी, बुमराहमुळे विराट टेन्शनमध्ये! ) कोरोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची कोरोना टेस्ट करण्याची गरज नाही, असा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे (Corona test guidelines). ज्या व्यक्तींना कोरोनाचा जास्त धोका नाही, अशा व्यक्तींसाठी हा निर्णय आहे. जास्त धोका असलेल्या व्यक्ती म्हणजे ज्यांचं वय जास्त आहे, किंवा त्यांना इतर आजार आहे. इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने कोरोना चाचणीबाबत नवी मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत. कोणत्या व्यक्तीची कोरोना टेस्ट कऱण्याची गरज नाही याची त्यांनी यादी दिली आहे. यामध्ये खालील लोकांचा समावेश आहे. -

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात