ऑर्थर रोडनंतर आता भायखळा तुरुंगातही घुसला 'कोरोना', महिला कैदी पॉझिटिव्ह

ऑर्थर रोडनंतर आता भायखळा तुरुंगातही घुसला 'कोरोना', महिला कैदी पॉझिटिव्ह

भायखळा तुरुंगातील 54 वर्षीय महिला कैदीला कोरोनाची लागण झाली आहे.

  • Share this:

मुंबई, 10 मे: मुंबईत कोरोनाचा संसर्ग झपाट्यानं वाढत आहे. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 12 हजारांवर पोहोचली आहे तर आतापर्यंत 489 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भायखळा तुरुंगातील 54 वर्षीय महिला कैदीला कोरोनाची लागण झाली आहे.

भायखळा तुरुंगात एका महिला कैदीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.  या तुरुंगात आढळलेला हा पहिला कोरोना रुग्ण आहे. महिलेला आधी जेजे रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. मात्र, तिला श्वास घेताना त्रास होऊ लागल्याने तिला आता सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती भायखळा तुरुंगाच्या व्यवस्थापनाने दिली आहे.

हेही वाचा..25 हजारांत 1 लाख लिटर दारू, भामट्यांनी घरीच सुरु केला होता गोरखधंदा!

संबंधित महिला कैदीचे 8 मे रोजी स्वॅबचे नमुने घेण्यात आले होते. मात्र, त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मात्र, 9 मे रोजी घेतलेल्या टेस्टचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, या आधी मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगातील 72 कैदी आणि 7 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या 72 कैद्यांना जीटी आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

तुरुंगात आहेत 2 हजार कैदी

तुरुंग प्रशासनाने आतापर्यंत 150 हून अधिक कैद्याच्य कोरोना टेस्ट केल्या आहेत. त्यात कैदी आणि तुरुगांतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. सध्या तुरुंगात 2000 हून जास्त कैदी आहेत. त्यात सामान्य कैद्यांसह अंडरवर्ल्डशी संबंधित कुख्यात गुन्हेगारांचाही समावेश आहे.

First published: May 10, 2020, 2:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading