Home /News /mumbai /

टेस्टिंग कमी म्हणून मुंबईतील कोरोनाचा आकडा घटला? BMC आयुक्तांनी केला मोठा खुलासा

टेस्टिंग कमी म्हणून मुंबईतील कोरोनाचा आकडा घटला? BMC आयुक्तांनी केला मोठा खुलासा

शिक्षकांची कोरोना तपासणी आवश्यक असणार आहे.

शिक्षकांची कोरोना तपासणी आवश्यक असणार आहे.

Mumbai coronavirus : मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या कमी होण्याचं नेमकं कारण महापालिका आयुक्त इक्बाल चहल (BMC Commissioner Iqbal Chahal) यांनी सांगितलं आहे.

    मुंबई, 28 एप्रिल:  गेले काही दिवस मुंबईतील कोरोना रुग्णांचा (Mumbai coronavirus) आकडा कमी झाला. याचं कारण म्हणजे कोरोना चाचणी (Mumbai corona test) कमी झाली आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जातो आहे. चाचण्या कमी होत असल्याने कमी प्रमाणात लोक पॉझिटिव्ह आढळून येत आहे, असा आरोप विरोधकांनी केला आहे. खरंच चाचणी कमी झाल्याने मुंबईतील कोरोना रुग्णसंख्या कमी झाली आहे का? याबाबत मुंबई महापालिका (BMC) आयुक्तांनी उत्तर दिलं आहे. मुंबईतील कोरोना रुग्णांची आकडेवारी कमी झाली आहे. यासाठी चाचणी कमी होणं हे कारण आहे का? याबाबत न्यूज 18 लोकमतने बीएमसी आयुक्त इक्बाल चहल (BMC Commissioner Iqbal Chahal) यांच्याशी चर्चा केली. इक्बाल चहल यांनी सांगितलं, "मार्च 2020 मध्ये कोरोनाची पहिली लाट आल्यापासून ते 10 फेब्रुवारी, 2021 पर्यंत मुंबईत दररोज 24,500 च्या वर कोरोना टेस्टिंग गेली नाही. पण कोरोनाची दुसरी लाट आली. त्यानंतर आपण ही टेस्टिंग 24 हजारांवरून 56 हजारांवर नेली. मुंबईत 55 टेस्टिंग लॅब आहेत. त्यांची क्षमता दिवसाला 50 हजार चाचण्यांची आहे. यापेक्षा जास्त टेस्टिंग होत असल्याने त्यांनाही अडचण येत होती. त्यामुळे लोकांना दोन-तीन दिवस चाचणीचे रिपोर्ट मिळत नव्हते. गंभीर लोकांची तब्येत बिघडत होती आणि परिणामी मृत्यूही होत होते" हे वाचा - maharashtra lockdown : राज्यात 15 मेपर्यंत लॉकडाऊन वाढवला! चहल पुढे म्हणाले, "त्यानंतर मग आम्ही मुंबईतील सर्व लॅबची बैठक घेतली आणि त्यांना कार्पोरेट टेस्टिंग बंद करायला सांगितले. कारण होम कलेक्शनच्या स्वॅब टेस्टिंगसाठी फोन येत असताना स्लॉट नसल्याचं सांगत लॅब दोन-तीन दिवसांनंतरचा वेळ देत असत. आम्ही त्यांना असं न करण्यास सांगितलं. कार्पोरेट टेस्टिंग बंद करून होम कलेक्शनच्या टेस्टिंगवर भर द्यायला सांगितला आणि त्याचे रिपोर्ट 24 तासांत देण्यास सांगितले.  लॅबनी बीएमसीने दिलेल्या आदेशाप्रमाणे आठ ते दहा हजार कार्पोरेट टेस्टिंग कमी केली" चहल यांनी सांगितलं, "1 एप्रिल ते 27 एप्रिलपर्यंत आपण 11 लाख 91 हजार चाचण्या केल्या आहेत. याचा अर्थ सरासरी 44,100 चाचण्या होत आहेत. शनिवारी-रविवारी हा आकडा 30 हजारपर्यंत कमी होतो. पण तरी आपला सरासरी दर हा 44 हजार आहे. पण फक्त 30 हजार हा आकडा पाहून टेस्टिंग कमी केल्याचं सांगितलं जातं आहे. जर आम्ही टेस्टिंग केल्या नसत्या तर मग आजारी लोकांच्या मृत्यूचा आकडा वाढला असता. पण मुंबईतील मृत्यूदर हा 0.4 टक्के आहे. जगातील हा सर्वात कमी मृत्यूदर आहे" हे वाचा - मोठी बातमी! 1 मे पासून राज्यात लसीकरण सुरू होणार नाही "शिवाय फक्त चाचण्या वाढवण्याला महत्त्व नाही. महत्त्वाचा आहे तो पॉझिटिव्ही रेट. म्हणजे दर 100 लोकांमागे किती लोक पॉझिटिव्ह आहेत, ते महत्त्वाचं आहे. मुंबईचा पॉझिटिव्ही रेट आधी 31 टक्के होता जो आता 12.5 टक्क्यांवर आला आहे", असं चहल म्हणाले.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: BMC, Coronavirus, Covid-19, Maharashtra, Mumbai

    पुढील बातम्या