बाळासाहेब थोरातांच्या बंगल्यावर कोरोनाची एंट्री, सात दिवस राहणार क्वारंटाइन

बाळासाहेब थोरातांच्या बंगल्यावर कोरोनाची एंट्री, सात दिवस राहणार क्वारंटाइन

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या शासकीय बंगला रॉयलस्टोन येथील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे.

  • Share this:

मुंबई, 07 जुलै : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे हाहाकार उडाला आहे. कोरोनाबाधितांच्या संख्येत आता मुंबईने चीनलाही मागे टाकले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या बंगल्यावर कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे थोरात होम क्वारंटाइन झाले आहे.

महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या  शासकीय बंगला रॉयलस्टोन येथील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून बाळासाहेब थोरात यांना क्वारंटाइन राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुढील सात दिवस बाळासाहेब थोरात हे होमक्वारंटाइन राहणार आहे. शासकीय बंगल्यावरील  टेलिफोन ऑपरेटर कर्मचारी हा कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. त्याच्यावर उपचार सुरू आहे.

शिवसेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत का दिला प्रवेश? रोहित पवारांचं स्पष्टीकरण

विशेष म्हणजे, बाळासाहेब थोरात हे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार होते. पण ही भेट अचानक रद्द करण्यात आली.

लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण

दरम्यान, लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण होण्याची यादी दिवसेंदिवस वाढत चालली आहे.  राजकीय नेत्यांमध्ये राज्यात सर्वप्रथम राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना कोरोनाची लागण झाली. काही दिवसांच्या उपचारानंतर जितेंद्र आव्हाड या संकटातून सुखरूप बाहेर पडले. त्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये काँग्रेस नेते आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचाही कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला.

कोरोना झाल्यानंतरही तू जिवंत कशी? नागरिकांचा महिलेच्या कुटुंबावर बहिष्कार

अशोक चव्हाण हे उपचारासाठी नांदेडहून मुंबईत दाखल झाले. यशस्वी उपचारानंतर तेही पुन्हा सुखरूप घरी परतले. त्यानंतर कोणतीही लक्षणं न दिसणाऱ्या धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची बाधा झाली. सुदैवाने मुंबईतील एका रुग्णालयातील 11 दिवसांच्या उपचारानंतर धनंजय मुंडे यांनीही कोरोनावर मात केली. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यासह कुटुंबातील 8 सदस्यांनाही लागण झाली आहे. पुण्यात उपमहापौर, खासदार आणि आमदारांनाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.

संपादन - सचिन साळवे

Published by: sachin Salve
First published: July 7, 2020, 2:58 PM IST
Tags:

ताज्या बातम्या