जाहिरात
मराठी बातम्या / मुंबई / भाई जगताप शिवसेनेवर भडकले, म्हणाले, कोर्टात जाणार, महाविकास आघाडीवर परिणाम होणार?

भाई जगताप शिवसेनेवर भडकले, म्हणाले, कोर्टात जाणार, महाविकास आघाडीवर परिणाम होणार?

भाई जगताप शिवसेनेवर भडकले, म्हणाले, कोर्टात जाणार, महाविकास आघाडीवर परिणाम होणार?

मुंबई महापालिकेकडून नुकतंच वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. पण या आरक्षण सोडतीवर काँग्रेस नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. याच नाराजीतून काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 2 जून : मुंबई महापालिकेकडून (BMC) नुकतंच वॉर्डनिहाय आरक्षण जाहीर करण्यात आलं आहे. पण या आरक्षण सोडतीवर काँग्रेस (Congress) नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. याच नाराजीतून काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष भाई जगताप (Bhai Jagtap) यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर (Shiv Sena) निशाणा साधला. “वार्ड पुनर्रचनामधून काही विशिष्ट लोकांचा राजकीय फायदा करण्यात आला आहे. वार्ड पुनर्रचना आणि प्रभाग सोडत ही पुर्वग्रहदुषित. शिवसेनेचा डाव आहे की काँग्रेसला त्रास व्हायला हवा. म्हणून हे केलं जातंय”, असा घणाघात भाई जगताप यांनी केली आहे. “दक्षिण मुंबईत 30 वॉर्ड आहेत. यापैकी 21 वॉर्डमध्ये महिलांसाठी आरक्षित ठेवण्यात आलं आहे. हे कसं शक्य होऊ शकतं? इतर ठिकाणीही काही प्रमाणात अशीच स्थिती आहे. कुर्ला भागात आरक्षण टाकलं. मागच्या वेळी तिथे आरक्षण नव्हतं. 2012 मध्ये OBC महिलेसाठी आरक्षित होतं. मात्र आता तो निकष कुठे लागतो? हे आरक्षण पूर्णपणे बायस, पूर्वग्रहदूष आहे. महापालिका आयुक्त आणि शिवसेनेने हे मिळून केले आहे”, अशी टीका भाई जगताप यांनी केली. “शिवसेनेचा डाव आहे की काँग्रेसला त्रास व्हायला हवा. म्हणून हे केलं जातंय. 29 वार्ड पैकी 21 जागा महीला आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत. बब्बु खान यांच्या 190 क्रमांकाच्या वॅार्डमध्ये अनुसुचित जाती महिला आरक्षित ठेवण्यात आले आहे. लोकसंखेनुसार आरक्षण ठरते. संबंधित वॉर्डमध्ये 7 टक्के अनुसुचित जातीची लोकसंख्या आहे”, असं भाई जगताप म्हणाले. ( औरंगाबाद दौऱ्याच्या आधी आली मुख्यमंत्र्यांना जाग, पाणी प्रश्नावर दिले कडक आदेश ) भाई जगताप यांनी यावेळी आपण आरक्षण सोडतीविरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशारा दिला. “आमच्या हरकती आणि सूचना मान्य केल्या नाहीत तर आरक्षण सोडती विरोधात काँग्रेस न्यायालयात जाणार. राज्यात जरी आम्ही एकत्र असलो तरी पालिकेत विरोधी बाकावर आहोत. काँग्रेसला गृहीत धरू नका. भाजपाच्या राक्षसाला विरोध करण्यासाठी आम्ही एकत्र आहोत, अशा शब्दांमध्ये भाई जगताप यांनी शिवसेनेला सुनावलं आहे. काँग्रेस नेते रवी राजा यांनीदेखील यावेळी व्यक्त केला. “माझी ही सातवी निवडणूक आहे. वॉर्डची पुनर्रचना करतात तेव्ह नव्याने लॉटरी काढायला पाहिजे. मात्र 53 प्रभाग घोषित करुन टाकले. शिवसेनेच्या 87 जागा आहेत. यापैकी 22 जागांवर आरक्षण ठेवण्यात आलं आहे. तर भाजपच्या 84 जागा आहेत. त्यापैकी 18-19 जागा आरक्षित आहेत. पण काँग्रेसच्या 29 वार्ड पैकी 21 जागा महिला आरक्षित आहेत. या विरोधात आम्ही न्यायालयात जाणार. महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल हे सुपारी घेऊन काम करत आहेत”, अशी टीका रवी राजा यांनी केली. भाई जगताप भडकल्याने महाविकास आघाडीवर परिणाम होणार? मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीवर काँग्रेस नाराज आहे. विशेष म्हणजे त्याविरोधात काँग्रेस कोर्टातही जाणार आहे. त्यामुळे शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील संबंध ताणले जाण्याची शक्यता आहे. पण यामुळे महाविकास आघा़डीर परिणाम होणार का? हा महत्त्वाचा मुद्दा आहे. दरम्यान, काँग्रेसच्या गोटातून काल एक महत्त्वाची बातमी समोर आली होती. काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आघाडी करायला तयार आहे, असा निर्णय काल शिर्डीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला होता. यावेळी मुंबईतील महापालिकेच्या आरक्षण सोडतीविषयी देखील स्पष्ट करण्यात आलं होतं. मुंबई महापालिका हद्दीतील काही मुद्द्यांसाठी काँग्रेसचे काही नगरसेवक कोर्टात जावू शकतात. पण काँग्रेस आघाडीसाठी तयार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं. त्यामुळे आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीचे तीनही पक्ष एकत्र लढतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात