मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंबईसाठी काळरात्र; दोन दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींकडून मदत जाहीर

मुंबईसाठी काळरात्र; दोन दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींकडून मदत जाहीर

PMO announce Two lakh help:  एका रात्रीत मुंबईत (Mumbai Rain) दोन दुर्घटना घडल्या. या दोन्ही दुर्घटनेत 21  जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)  यांनीही दुःख व्यक्त (Expressed condolences) केलं आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  Pooja Vichare

नवी दिल्ली, 18 जुलै: रात्रभर कोसळणाऱ्या पावसानं मुंबईला (Mumbai) झोडपून काढलं आहे. एका रात्रीत मुंबईत दोन दुर्घटना घडल्या. या दोन्ही दुर्घटनेत 21 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दुःख व्यक्त केलं आहे. तसंच मृतांच्या नातेवाईकांसाठी मदतीचीही घोषणा केली आहे.

मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळी येथे भिंत कोसळल्यानं झालेल्या जीवितहानीमुळे दु: खी झालो. या दुर्घटनेत मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. दुर्घटनेत जखमी झालेले लवकरात लवकर बरे व्हावे अशी प्रार्थना.

तसंच मोदींनी या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांसाठी मदतीची घोषणा केली आहे. या मृत पावलेल्यांच्या नातेवाईकांना 2 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे. तर यात जखमी झालेल्यांना 50 हजार रुपये मदत जाहीर केली आहे.

चेंबूर भिंत कोसळली 15 जणांचा मृत्यू

चेंबूरमध्ये मध्यरात्री मुसळधार पावसामुळे दरड भिंतीवर कोसळली. त्यानंतर ही भिंतच कडेच्या घरांवर कोसळली. यात 15 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही एनडीआरएफचं पथक घटनास्थळी हजर आहे. बचावकार्य सुरू आहे. एकूण तीन घरांवर झाड आणि संरक्षक भिंत पडून घरांचे नुकसान झाले आहे.

धो-धो पावसामुळे मुंबई जलमय, आज मुंबईत कशी असेल पावसाची स्थिती

मध्यरात्री 12.30 ते 1 च्या सुमारास हा प्रकार घडला. दुर्घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली. एनडीआरएफनं दिलेल्या माहितीनुसार, टीम येण्याआधी स्थानिकांनी 2 मृतदेह बाहेर काढले होते. तर NDRFच्या टीमनं 10 मृतदेह आत्तापर्यंत बाहेर काढले आहेत. तसेच, अजूनही 7 जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्याची शक्यता एनडीआरएफच्या टीमनं वर्तवली आहे.

विक्रोळीत दुमजली इमारत कोसळली

विक्रोळीमध्ये एक दुमजली इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. विक्रोळीतील (Vikhroli) पंचशील नगर भागात दरड कोसळल्यानं ही दुर्घटना घडली आहे. (ground-plus-one residential building collapsed) यामध्ये तिघा जणांचा मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले आहेत. NDRF चे पथक घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य (Rescue operation is underway) वेगात सुरु आहे. (Mumbai's Vikhroli area)

Mumbai Train Update: मध्य रेल्वेला मुसळधार पावसाचा फटका, पश्चिम रेल्वे सुरळीत

विक्रोळीतील पंचशील नगर भागात पावसामुळे पाच-सहा घरांवर दरड कोसळली. यामध्ये तिघांचा मृत्यू झाला असून दोघे जण जखमी झालेत. मुंबई महापालिका आणि अग्निशमन दलाकडून बचावकार्य सुरु आहे. दरम्यान पाच ते सहा जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. (killing three people, as per BMC)

First published:

Tags: Mumbai rain, Narendra modi