मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

Mumbai Rain Highlights: मुंबईत रात्रभर धो-धो पाऊस; 24 तासात मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस

Mumbai Rain Highlights: मुंबईत रात्रभर धो-धो पाऊस; 24 तासात मुंबईसह ठाणे, पालघर, रायगड जिल्ह्यात अतिमुसळधार पाऊस

Mumbai Rain Updates: रात्रभर कोसळणाऱ्या पावसानं मुंबईला (Mumbai) झोडपून काढलं आहे. (Mumbai Rain) सर्व रस्ते जलमय झाले आहेत. जाणून घ्या अपडेट्स.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 18 जुलै: रात्रभर कोसळणाऱ्या पावसानं मुंबईला (Mumbai) झोडपून काढलं आहे. (Mumbai Rain) सर्व रस्ते जलमय झाले आहेत, तर अनेक भागात पाणी साचले आहे. मुंबई, ठाणे, (Thane), पालघर (Palghar), रायगड (Raigad) जिल्ह्यातआज 24 तासात काही ठिकाणी अतिमुसळधार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज, कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. पुढील तीन तासात पालघर, ठाणे, रायगड, मुंबई आणि उपनगरसह जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मुंबईसह उपनगरात रात्रीपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईच्या सर्व उपनगरात पावसाने थैमान घातलं आहे. शनिवारपासून तुफान पाऊस सुरु आहे. मुंबईला पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. रात्रभर मुसळधार पाऊस सुरुच आहे.

अंधेरी पश्चिम सबवे परिसरात अनेक घरांमध्ये पावसाचं पाणी शिरलं. जोरदार पावसामुळे शहरातील हिंदमाता आणि इतर सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याचं पाहायला मिळत आहे.

मुंबईत कशी असेल पावसाची स्थिती

पुढील आठवड्यात किंवा या महिन्यातील उर्वरित दिवसांदरम्यान पावसाची स्थिती काय असेल हे अस्पष्ट असल्याचं हवामान विभागाने सांगितले. जुलैमध्ये पडणाऱ्या तीव्र पावसाच्या अनुषंगाने सध्या तरी अनुकूल स्थिती नाही. सध्याची वाऱ्यांची दिशा बघता, पूर्व आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या विरोधी वाऱ्यांमुळे मुंबईपासून पाऊस लांबच राहिल, असे अक्षय देवरस यांनी सांगितले.

आयएमडीने 18 ते 20 जुलै दरम्यान मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला असून त्यानुसार, काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. तर दुसरीकडे 17 ते 22 जुलै दरम्यान मान्सून स्थिती कार्यरत राहिल असा अंदाज, अक्षय देवरस यांनी वर्तवला आहे.

मुंबईतील बोरिवली पूर्व भागात रविवार पहाटेपासूनच जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळे, परिसरात सगळीकडे पाणी साचलं (Rainwater Entered Mumbai's Borivali East Area) आहे.

रस्त्यांवर साचलेल्या या पाण्यामध्ये काही चारचाकी गाड्याही वाहून गेल्या आहेत. ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली असून घटनेचा व्हिडिओही (Video) समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये काही चारचाकी गाड्या पावसाच्या पाण्यात वाहून जात असल्याचं पाहायला मिळतं.

First published:

Tags: Mumbai, Mumbai rain, Palghar, Raigad, Thane