• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • मुसळधार पावसाचा फटका रेल्वेला; मध्य रेल्वे अजूनही कोलमडलेली, पश्चिम रेल्वे सुरळीत

मुसळधार पावसाचा फटका रेल्वेला; मध्य रेल्वे अजूनही कोलमडलेली, पश्चिम रेल्वे सुरळीत

Mumbai Local Train Updates: मुंबईत (Mumbai Rain) सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. अनेक भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

 • Share this:
  मुंबई, 18 जुलै: मुंबईत (Mumbai Rain) सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे. अनेक भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. सीएसटीएमवरुन जाणाऱ्या अनेक एक्सप्रेस आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या असून कल्याण-मुंबई लोकल सेवाही ठप्प झाली आहे. पश्चिम रेल्वे सुरळीत असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. (mumbai rain affect local train) उपनगरी लोकल ट्रेन अपडेट. (Western Suburban Local Train Update)फर्स्ट डाऊन लोकल चर्चगेट येथून 6.40 वाजता सुरू झाली. पहिली यूपी लोकल बोरिवली येथून 6.40 वाजता सुटली. मात्र मध्य रेल्वेची वाहतूक अद्यापही विस्कळीत आहे. सीएसएमटी ते ठाणे आणि सीएसएमटी - वाशी या दरम्यान लोकल गाड्या सुरु नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. सायन रेल्वे स्थानक परिसरामध्ये रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेल्याचं चित्र दिसून आलं. वसई विरार मध्ये रात्रीच्या पावसाने संपूर्ण वसई-विरार जलमय झाला असून रेल्वे ट्रॅकवर पाणी शिरल्याने रेल्वे सेवा पूर्णतः बंद झाली आहे. अनेकांच्या घरांमध्ये दुकानांमध्ये पाणी शिरल्याने मोठे नुकसान झालं आहे.
  Published by:Pooja Vichare
  First published: