Home /News /mumbai /

लोकलची वाट पाहतोय सामान्य मुंबईकर, पालिका आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

लोकलची वाट पाहतोय सामान्य मुंबईकर, पालिका आयुक्तांनी दिली महत्त्वाची माहिती

Mumbai Unlock: मुंबईतील संसर्गाचा दर 4 टक्क्यांच्याही खाली आला आहे. मुंबईत तिसऱ्या स्तरातील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.

  मुंबई, 19 जून: मुंबईतील संसर्गाचा दर 4 टक्क्यांच्याही खाली आला आहे. ब्रेक द चेनच्या (Break the Chain) नियमाअंतर्गत 'अनलॉक'च्या (Unlock) प्रक्रियेत मुंबई शहर आता (Mumbai)पहिल्या स्तरात आलं आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट (Positivity Rate) आणखी घसरला असून आठवडाभरात पॉझिटिव्हिटी रेट 3.79 टक्के इतका आहे. दरम्यान ही आकडेवारी दिलासादायक असली तरी मुंबईत अजूनही दररोज 500 ते 700 कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे मुंबईत तिसऱ्या स्तरातील निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. मुंबई पहिल्या टप्प्यात (1st Level) आली तर लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात येईल, अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली होती. त्यामुळे आता मुंबई लोकल (Mumbai Local) सर्वसामान्यांसाठी सुरु होणार का? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. मात्र पालिकेनं तिसऱ्या स्तरातील निर्बंध कायम ठेवल्यानं लोकल सेवा सुरु होण्यावर पाणी फिरलं आहे.

  हेही वाचा - येत्या आठवड्यात मुंबईचा कोणत्या स्तरात समावेश? वाचा सविस्तर

  मुंबई संसर्ग दरात पहिल्या स्तरात आणि ऑक्सिजन बेड्सच्या प्रमाणात दुसऱ्या स्तरात येत आहे. असं असलं तरी, मुंबईत सध्या तरी तिसऱ्या स्तरातील निर्बंध कायम राहणार असल्याचं मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलं. तसंच सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यावरही टप्प्याटप्प्यानं निर्णय घेण्यात येणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. महिलांना लोकल सुरु? लोकल सेवा टप्प्याटप्प्यानं सुरु करण्यात येईल. त्यात आधी महिलांसाठी लोकल सेवा सुरु करू त्यानंतर इतरांचा विचार केला जाईल. यामुळे लोकलमध्ये गर्दी होणार नाही. मात्र तत्पूर्वी मुंबई शहर दुसऱ्या टप्प्यात येण्यासाठी परिस्थितीत आणखी सुधारणा होण्याची गरज आहे आणि त्यानंतरच लोकल सेवेसंदर्भातले निर्णय घेण्यात येतील, असे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सांगितलं. मुंबई सध्या पहिल्या स्तरात आली असली तरी येत्या दोन ते तीन आठवड्यात तिसरी लाट येण्याची शक्यता आरोग्य मंत्रालयाकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी पालिकेकडून आराखडा तयार केला जात आहे. म्हणूनच शहरातील रुग्णसंख्या कमी झाली असली तरी सर्व निर्बंध शिथील करुन सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करणं धोकादायक ठरु शकतो, असं अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी म्हटलं आहे. पालिकेकडून सावध पावलं उचलली जात आहे. शहरातील रुग्णसंख्येत घट झाली असल्यानं पुढच्या आठवड्यासाठी काही निर्बंध शिथील करण्यावर येत्या दोन दिवसांत निर्णय घेण्यात येईल, असं सुरेश काकाणी यांनी सांगितलं. मुंबई पहिल्या स्तरात मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट (Positivity Rate) आणखी घसरला असून आठवडाभरात पॉझिटिव्हिटी रेट 3.79 टक्के इतका आहे. ऑक्सिजनची सुविधा असलेले 75 टक्क्यांहून अधिक बेड रिकामे झाले आहेत. त्यामुळं मुंबईतील निर्बंध शिथील होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात हा रेट 4.40 टक्के तर त्याआधीच्या आठवड्यात 5.25 टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट होता. आता 12 हजार 583 पैकी 9 हजार 626 ऑक्सिजन बेड (Oxygen Beds) रिकामी आहेत. म्हणजेच एकूण 2 हजार 967 ऑक्सिजन बेडवर रुग्ण (23.56 टक्के) आहेत.
  Published by:Pooja Vichare
  First published:

  Tags: Mumbai local, Train

  पुढील बातम्या