Home /News /mumbai /

येत्या आठवड्यात मुंबईचा कोणत्या स्तरात समावेश? वाचा सविस्तर

येत्या आठवड्यात मुंबईचा कोणत्या स्तरात समावेश? वाचा सविस्तर

Maharashtra Unlock: राज्य सरकारनं 'ब्रेक दि चेन' अंतर्गत लावलेले कोरोना निर्बंध टप्प्याटप्प्यानं उठविण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भातील ताजी आकडेवारी राज्य सरकारनं जाहीर करण्यात आली आहे.

    मुंबई, 18 जून: राज्य सरकारनं 'ब्रेक दि चेन' अंतर्गत लावलेले कोरोना निर्बंध टप्प्याटप्प्यानं उठविण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भातील ताजी आकडेवारी राज्य सरकारनं जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार मुंबईतील संसर्गाचा दर 4 टक्क्यांच्याही खाली आला आहे. ब्रेक द चेनच्या (Break the Chain) नियमाअंतर्गत 'अनलॉक'च्या (Unlock) प्रक्रियेत मुंबई शहर आता (Mumbai)पहिल्या स्तरात आलं आहे. मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट (Positivity Rate) आणखी घसरला असून आठवडाभरात पॉझिटिव्हिटी रेट 3.79 टक्के इतका आहे. ऑक्सिजनची सुविधा असलेले 75 टक्क्यांहून अधिक बेड रिकामे झाले आहेत. त्यामुळं मुंबईतील निर्बंध शिथील होण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात हा रेट 4.40 टक्के तर त्याआधीच्या आठवड्यात 5.25 टक्के इतका पॉझिटिव्हिटी रेट होता. आता 12 हजार 583 पैकी 9 हजार 626 ऑक्सिजन बेड (Oxygen Beds) रिकामी आहेत. म्हणजेच एकूण 2 हजार 967 ऑक्सिजन बेडवर रुग्ण (23.56 टक्के) आहेत. हेही वाचा- Watch Exclusive Video: आरोग्य कर्मचाऱ्यांचा उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासमोर राडा राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन खात्यानं नवी आकडेवारी जाहीर केली आहे. मुंबईत सध्या तिसऱ्या स्तराचे निर्बंध लागू आहेत. मुंबई पहिल्या टप्प्यात (1st Level) आली तर लोकल ट्रेन सर्वसामान्यांसाठी सुरू करण्यात येईल, अशी माहिती मंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी दिली होती. त्यामुळे आता मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु होणार का? तसंच मुंबई पालिका (Mumbai BMC) आता शहरात पहिल्या की दुसऱ्या स्तराचे निर्बंध लागू करेल? याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Coronavirus, Mumbai

    पुढील बातम्या