मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबई पालिकेची नवी कोरोना लसीकरण मोहिम, Door-To-Door चाचणीस आजपासून सुरुवात

मुंबई पालिकेची नवी कोरोना लसीकरण मोहिम, Door-To-Door चाचणीस आजपासून सुरुवात

BMC trial door to door corona vaccination campaign:   मुंबई पालिकेची (Brihanmumbai Municipal Corporation ) महत्त्वाकांक्षी कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला आजपासून सुरुवात झाली आहे. सध्या ही मोहिमेची ट्रायल चाचणी सुरु झाली आहे.

मुंबई, 30 जुलै: मुंबईत कोरोना (corona Virus) रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा आकडा कमी होत चालला आहे. तसंच मुंबईत लसीकरणही (covid-19 vaccination) वेगानं सुरु आहे. त्यातच मुंबईत मुंबई पालिकेची (Brihanmumbai Municipal Corporation) महत्त्वाकांक्षी कोरोना लसीकरणाच्या मोहिमेला आजपासून सुरुवात झाली आहे. सध्या ही मोहिमेची ट्रायल चाचणी सुरु झाली आहे.

मुंबई पालिकेनं (BMC) आजपासून कोविड -19 लसीकरणासाठी डोअर-टू- डोअर (door-to-door) मोहिमेची चाचणी सुरू केली आहे. शहरातील जे नागरिक अंथारुणावर आहेत, ज्यांना उलटा-बसता येत नाही म्हणजेच अंथारुणाला खिळले आहेत, अशा नागरिकांसाठी हे लसीकरण असेल. अंधेरी पूर्व, मरोळ, चकाला आणि इतर पश्चिम उपनगरे असलेल्या के पूर्व प्रशासकीय प्रभागात सुरुवातील हा उपक्रम राबवला जाणार असल्याचं, पालिकेनं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

CBSE बोर्डाचा 12 वीचा निकाल जाहीर, 99.37 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण

बीएमसीने जे लोकं अंथरुणावर आहेत अशा नागरिकांची माहिती covidvacc2bedridden@gmail.com वर ई-मेल करण्यास सांगितली आहे. आतापर्यंत अशा 4 हजार 466 नागरिकांचा तपशील प्राप्त झाला असल्याची माहिती पालिकेनं दिली आहे.

विविध शारीरिक किंवा वैद्यकीय कारणांमुळे अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांना या मोहिमेअंतर्गत लसीकरण केले जाईल, असं पालिकेनं स्पष्ट केलं आहे.

First published:

Tags: BMC, Corona vaccination, Corona vaccine, Mumbai muncipal corporation